फ्लोरीडा। रविवारी(4 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात दुसरा टी20 सामना लॉडरहिल, फ्लोरिडा येथे पार पडला. या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार 22 धावांनी विजय मिळवला आणि 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.
या विजयाबरोबरच भारताचा कर्णधार विराट कोहलीने खास विक्रम केला आहे. या सामन्यात विराटने 23 चेंडूत 28 धावांची खेळी केली. याबरोबरच तो ट्वेंटी20 क्रिकेट प्रकारात सर्वाधिक धावा करणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
त्याच्या आता ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये 268 सामन्यात 40.46 च्या सरासरीने 8416 धावा झाल्या आहेत. हा पराक्रम करताना त्याने सुरेश रैनाच्या ट्वेंटी20 क्रिकेटमधील 8392 धावांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
तसेच विराट आता ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या एकूण खेळाडूंच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आला आहे.
ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने ट्वेंटी20 मध्ये 384 सामन्यात 39.04 च्या सरासरीने 12808 धावा केल्या आहेत.
त्याचबरोबर या यादीत 8291 धावांसह भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा हा रैना आणि विराटच्या पाठोपाठ आठव्या क्रमांकावर आहे.
ट्वेंटी20 मध्ये (सर्व प्रकारच्या 20 षटकांच्या सामन्यात )सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
12808 धावा – ख्रिस गेल (384 सामने)
9922 धावा – ब्रेंडन मॅक्यूलम (370 सामने)
9373 धावा – किरॉन पोलार्ड (477 सामने)
8803 धावा – डेव्हिड वॉर्नर (271 सामने)
8701 धावा – शोएब मलिक (345 सामने)
8416 धावा – विराट कोहली (268 सामने)
8392 धावा – सुरेश रैना (319 सामने)
8291 धावा – रोहित शर्मा (316 सामने)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–शानदार अर्धशतकी खेळी करत रोहित शर्माचा टी२०मध्ये विश्वविक्रम; विराटला टाकले मागे
–‘यूनिवर्स बॉस’ ख्रिस गेलला मागे टाकत ‘हिटमॅन’ रोहित शर्माने केला मोठा विश्वविक्रम
–विंडीज विरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यासाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया