विराट कोहलीला बालपणी ज्या प्रशिक्षकानी क्रिकेटचे धडे शिकवले, ते प्रशिक्षक म्हणजे राजकुमार शर्मा होय. राजकुमार शर्मा यांची रविवारी(20 डिसेंबर) दिल्ली जिल्हा क्रिकेट संघ (डीडीसीए) मध्ये दिल्लीच्या वरीष्ठ संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. डीडीसीएने याची रविवारी घोषणा केली.
राजकुमार शर्मा यांच्या व्यतिरिक्त गुरशरम सिंह यांना दिल्ली संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा हे रणजी खेळाडू राहिले आहेत. ते उजव्या हाताचे फलंदाज होते आणि फिरकीपटू सुद्धा होते. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये दिल्ली संघाचे 9 सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे.
राजकुमार शर्मा यांना 2016 साली विराटच्या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.
याबरोबरच आशु दाणी यांची डीडीसीएच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आले आहेत. ज्यामध्ये मोहन चतुर्वेदी आणि चेतन्य नंदा व इतर दोन सदस्य आहेत. क्रिकेट सल्लागार समितीचे अध्यक्ष अतुल वासन किंवा त्यांनी सुचवलेली व्यक्ती निवड समितीत पर्यवेक्षक म्हणून काम करेल.
त्याचबरोबर उमेश चिकारांना प्रशिक्षक, तर गजेंद्र कुमार यांना फिजियो म्हणून निवडण्यात आले आहे. 10 जानेवारी पासून सय्यद मुश्ताक अली स्पर्धेने भारतात देशांतर्गत टी-20 क्रिकेट स्पर्धाना सुरुवात होईल.
राजकुमार शर्मा हे विराट कोहलीचे गुरू म्हणून ओळखले जातात
राजकुमार शर्मा यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला लहानपणी क्रिकेटचे धडे दिले. आज तोच विराट कोहली जगातील महान खेळाडूपैकी एक आहे. लहानपणी जेव्हा विराट गल्ली क्रिकेटमध्ये खेळू लागला होता. तेव्हा त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाने त्याच्यातील गुणवत्ता बघितली.
त्यानंतर त्याने ही बाब विराटच्या वडिलांना सांगितली आणि सल्ला दिला की विराट मध्ये गुणवत्ता आहे, त्यामुळे त्याला कोणत्या तरी अकादमीत शिकायला पाठवा. त्याची गुणवत्ता अशी गल्ली क्रिकेटमध्ये वाया जावू देवू नका. विराटच्या वडिलांनी त्याला राजकुमार शर्मा यांच्या अकादमीत दाखल केले.
त्यानंतर राजकुमार शर्मा यांनी त्या लहान विराट कोहलीला घडवायला सुरवात केली.
महत्त्वाच्या बातम्या –
पृथ्वी शाॅने सोडले मौन; सोशल मीडियावरून टीकाकारांना दिले उत्तर
दुःखद! कोरोनामुळे सचिनच्या जिवलग मित्राचा मृत्यू, एकेकाळी सोबत खेळले होते क्रिकेट
“महिला क्रिकेटविषयी बीसीसीआयमध्ये स्पष्टतेचा अभाव”; माजी महिला क्रिकेटपटूने मांडले परखड मत