---Advertisement---

VIDEO: हा बुमराह की विराट? सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ; तुम्हीही पाहा

On: सोमवार, मार्च 14, 2022 12:12 AM
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका (INDvSL) यांच्यादरम्यान बेंगलोर येथे कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या दोन दिवसानंतर भारतीय संघाने सामन्यावर चांगलीच पकड मिळवलीये. भारतीय संघाने आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली असून, श्रीलंकेला सामन्यातून पुरते बाहेर केले. त्याचवेळी या सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळादरम्यान संघाच्या वरिष्ठ फलंदाज विराट कोहली मजामस्ती (Virat Kohli Copied Bumrah Action) करताना दिसून आला.

विराटचा मजेदार अवतार

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा आपल्य आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. मात्र, तो तितकाच मजेदार व खोडकर स्वभावाचा आहे हे वारंवार दिसून येते. बेंगलोर कसोटीच्या पहिल्या दिवशी याचा प्रत्यय सर्वांना आला. ड्रिंक ब्रेकदरम्यान विराट चक्क संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याची नक्कल करताना दिसून आला. विराटने सुरुवातीला त्याच्याप्रमाणे रन अप घेतला आणि त्या नंतर त्याच्या सारखी गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा अंदाज पाहून सर्व संघसहकारी ‌‌हसायला लागले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

https://twitter.com/Anmol_Narang25/status/1502647710679445506?t=c1P_MV0W0Z0OinXEON-tyw&s=19

यापूर्वी केलेली हरभजनची नक्कल

यापूर्वी एकदा विराट कोहली चा हरभजन सिंगच्या गोलंदाजी शैलीची नक्कल करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर स्वतः हरभजन सिंगने प्रतिक्रिया दिलेली. तसेच ड्रेसिंग रूममध्ये विराट सहकाऱ्यांना सतावताना दिसतो.

भारतीय संघाची सामन्यावर पकड

बेंगलोर कसोटीत दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केले आहेत. पहिला डाव २५२ धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला १०९ धावांवर गुंडाळले. त्यानंतर, भारताने दुसर्‍या डावात आक्रमक फलंदाजी करताना ३०३ धावांवर आपला डाव घोषित करत श्रीलंकेसमोर विजयासाठी ४४७ धावांचे लक्ष ठेवले. उर्वरित ९ बळी घेऊन भारताला हा सामना तिसऱ्या दिवशी जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.

महत्वाच्या बातम्या-

INDvSL: क्लीन स्वीप देण्यापासून टीम इंडिया ९ बळी दूर; दुसरा दिवस रिषभ-श्रेयसच्या नावे (mahasports.in)

‘मी नेतृत्व करताना कधीही विराट कोहली बनणार नाही, पण एमएस धोनी…’, फाफ डू प्लेसिसचं मोठं वक्तव्य (mahasports.in)

बंगळुरूत घोंगावलं पंत नावाचं वादळ! मोडलाय थेट ४० वर्षांपूर्वीचा विक्रम (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---