नॉटिंगघम। इंग्लंड विरुद्ध भारत चौथ्या कसोटीत विराट कोहलीने कसोटीत ६ हजार धावांचा टप्पा पार केला. त्याला हा पराक्रम करण्यासाठी केवळ ६ धावांची गरज होती.
विराटचा हा कसोटी कारकिर्दीतील ७०वा सामना आहे. भारताच्या या २९ वर्षीय कर्णधाराने ७० सामन्यातील ११९ डावात ५४.५७च्या सरासरीने ६००३ धावा केल्या आहेत.
याबरोबर विराटने काही खास पराक्रम केले. त्यातील काही खास पराक्रम-
-कसोटीत ६ हजार धावा करणारा १०वा भारतीय खेळाडू. सचिन, द्रविड, गावसकर, लक्ष्मण, सेहवाग, गांगुली, वेंगसकर, अझर आणि गुंडप्पा विश्वनाथ यांनी यापुर्वी ६ हजार किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
-कसोटीत भारताकडून जलद ६ हजार धावा करणारा विराट दुसरा खेळाडू. सुनिल गावसकर यांनी ११७ कसोटी डावात तर विराटने ११९ कसोटी डावात हा टप्पा पार केला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने १२० डावात हा कारनामा केला होता.
कसोटीत जलद ६ हजार धावा करणारे भारतीय खेळाडू (कमी डावात)
११७- सुनिल गावसकर
११९- विराट कोहली
१२०- सचिन तेंडुलकर#म #मराठी @MarathiRT @MarathiBrain @Mazi_Marathi @MarathiAamhi @WeMarathi @Marhathi @MarathiWord @Marathi_Vishwa @HashTagMarathi @BeyondMarathi @YoMarathi— Maha Sports (@Maha_Sports) August 31, 2018
– केवळ १४ डावात विराटने ५ हजार ते ६ हजार धावांचा टप्पा पार केला. यापुर्वी त्याने वैयक्तिक ३ ते ४ हजार आणि ४ ते ५ हजार धावांचा टप्पा प्रत्येकी १६ डावात पुर्ण केला होता.
-कसोटीत आणि वनडेत ६ हजारांचा धावा ५०पेक्षा जास्तच्या सरासरीने पार करणारा विराट जगातील पहिलाच खेळाडू.
-४५३- कसोटीत दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्युझीलंड किंवा आॅस्ट्रेलिया देशांत आशिया खंडातील कसोटी कर्णधाराने मालिकेत केलेल्या सर्वोच्च धावा. यापुर्वी विराटनेच हा पराक्रम आॅस्ट्रेलियामध्ये केला होता. २०१४-१५मध्ये त्याने ४४९ धावा केल्या होत्या.
-कसोटीत जलद ६ हजार धावा करणारा विराट जगातील ९वा खेळाडू.
कसोटीत जलद ६ हजार धावा करणारे खेळाडू (कमी डावात)
६८- डाॅन ब्रॅडमन
१११- सर गारफिल्ड सोबर्स
१११- स्टीव स्मिथ
११४- विली हेमंड
११६- सर लेन ह्युटन
११६- केन बॅरिंगटन
११६- कुमार संगकारा
११७- सुनिल गावसकर
११९- विराट कोहली
१२०- सर व्हीव्हीयन रिचर्ड्स
१२०- सचिन तेंडुलकर
१२०- मोहम्मद युसुफ— Maha Sports (@Maha_Sports) August 31, 2018
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
– बरोबर ५० वर्षांपुर्वी या खेळाडूने एकाच षटकात मारले होते ६ षटकार
– याच दिवशी ७ वर्षांपुर्वी द्रविडने घेतला होता क्रिकेटमधील सर्वात मोठा निर्णय
– वाढदिवस विशेष- जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी
– टाॅप ४- जसप्रीत बुमराहचे ते ४ नो बाॅल आणि इतिहास…
– ५२६ कसोटी सामन्यांत टीम इंडियाकडून पहिल्यांदाच असे घडले
– अश्विन चौथ्या कसोटीत चमकला, कुंबळे- भज्जीच्या यादीत सामील