आजपासून (४ ऑगस्ट) ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पहिल्या कसोटी सामन्याला प्रारंभ होणार आहे. या कसोटीला अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. तरीही अद्याप भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली नाही. त्यामुळे सर्वच भारतीय क्रिकेट चाहत्यांना जाणून घेण्याची उत्सुकता असेल की, भारतीय संघात कुठल्या खेळाडूंना अंतिम ११ मध्ये स्थान दिले जाईल.
पहिला कसोटी सामना सुरू होण्याच्या पूर्व संध्येला विराट कोहलीला प्लेइंग इलेव्हन बाबत प्रश्न विचारला असता, विराटने प्रतिक्रीया देत म्हटले की, “प्लेइंग इलेव्हनची घोषणा नाणेफेक झाल्यानंतर केली जाईल. गेल्या काही मलिकांपासून भारतीय संघ एक दिवसापूर्वीच आपल्या प्लेइंग इलेव्हेनची घोषणा करत आहे. इतकेच नव्हे तर न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत देखील भारतीय संघाने एक दिवसापूर्वीच प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली होती, ज्यामुळे विरोधी संघाला खेळाडूंबद्दल रणनिती आखण्यासाठी वेळ मिळतो.”
भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळेल? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण मालिका सुरू होण्यापूर्वी संघातील मुख्य सलामीवीर फलंदाज शुबमन गिल मालिकेतून बाहेर झाला आहे. तर मयंक अगरवाल दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. परंतु विराट कोहलीने आधीच स्पष्ट केले आहे की, डावाची सुरुवात कोण करणार ही संघासाठी चिंतेची बाब नाही.
शार्दुल ठाकूरला मिळू शकते संधी?
तसेच पत्रकार परिषदेत विराट कोहलीने म्हटले, “शार्दुल ठाकूर हा फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात मोलाचे योगदान देऊ शकतो. त्याला आम्ही फक्त इंग्लंड मालिकेसाठी महत्वाचे मानत नाही तर तो आमच्या भविष्यातील योजनांचा एक भाग आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “या ळी आम्ही पूर्वीपेक्षा अधिक तयार आहोत. आम्ही जो वेळ इंग्लंडमध्ये घालवला आहे, त्याचा आम्हाला येथील परिस्थितीशी जुळवून घेण्यात खूप फायदा झाला आहे. आता फक्त मैदानात तयारी दाखवायची आहे. प्रत्येक मालिका ही माझ्यासाठी कसोटी सारखीच आहे. आम्ही प्रत्येक मालिकेत त्याच उत्साहात खेळतो. मला नाही वाटत की, कुठलीही मालिका इतर कुठल्या मालिकेपेक्षा जास्त महत्वाची असेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
शमीकडे कसोटी विकेट्सचा ‘द्विशतकवीर’ बनवण्याची संधी, इंग्लंडचा समाचार घेत साधणार ही किमया
अय्या! ‘नॅशनल क्रश’ प्रिया वारियरला आवडते आयपीएलची ‘ही’ टीम; खुद्द अभिनेत्रीनेच केलाय खुलासा
ENGvIND: अष्टपैलू २ तर वेगवान गोलंदाज ४, टीम इंडियाविरुद्ध ‘असा’ असेल जो रूटचा संघ