सध्या भारतीय संघाच्या फिटनेसची चर्चा जगभरातील क्रिकेट वर्तुळात होत आहे आणि त्याचे श्रेय कर्णधार विराट कोहलीला जाते. कारण विराट स्वतः जगातील सर्वात तंदुरुस्त क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याची व्यायामाची मेहनत आणि त्यासाठी त्याची ठरलेली दिनचर्या अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. मात्र, विराटने आपल्या आहारात अनेक बदल केल्यानंतर ही शारीरिक चपळता आणि तंदुरुस्ती कमावली आहे. विराट काय खातो? आणि काय पितो? हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे असते. म्हणून आमच्या वाचकांसाठी ही खास माहिती घेऊन आलो आहोत.
विराटच्या फिटनेसमध्ये आज सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे? कदाचित फार कमी लोकांना माहीत असेल की, विराट कोणतेही सामान्य पाणी नाही. तर काळे पाणी पितो अर्थात ब्लॅक वॉटर, ज्याची किंमत खूप महाग आहे.
एका अहवालानुसार, भारतीय कर्णधार विराट कोहली ब्लॅक वॉटर पितो आणि या पाण्याची किंमत 3000 ते 4000 रुपये प्रति लिटर आहे. या पाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात नैसर्गिक काळे अल्कधर्मी पदार्थ असतात. या पदार्थांमुळे शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही. आपल्याला जास्त काळासाठी शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. ब्लॅक वॉटरचे पीएच खूप जास्त असते आणि ते शरीराला जास्त काळ हायड्रेटेड ठेवते. कदाचित याच कारणामुळे विराट खेळपट्टीवर वेगवान धावतो. तसेच मैदानावर चपळ क्षेत्ररक्षण करतो.
इतकेच नाही तर विराट कोहली ‘वेगण डायट’ घेतो. अर्थात या प्रकारात प्राण्यांपासून मिळणारे कुठलेच पदार्थ आपल्या आहारात येऊ द्यायचे नसतात. अगदी दुधही नाही. वनस्पतीजन्य आहार यात घ्यायचा असतो. विराट आपल्या खाण्या-पिण्याच्या बाबतीत अतिशय शिस्तबद्ध असतो, त्याचाच चांगला परिणाम त्याच्या फिटनेसवर दिसून येतो. परिणामी तो त्याच्या खेळातही दिसून येतो.
केवळ विराट कोहलीच नाही तर बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलासह इतर अनेक सेलिब्रिटी देखील फिट राहण्यासाठी या ‘ब्लॅक वॉटर’ पाण्याचा वापर करतात.
महत्त्वाच्या बातम्या-
“जर मी रूटच्या जागी असतो, तर मी बेन स्टोक्सला पुन्हा बोलवले असते”, दिग्गज भारतीय क्रिकेटरचा सल्ला
मस्तीखोर पंतने स्वत:ला म्हटले वर्गातील सर्वात ‘सभ्य मुलगा’, अक्षर-ईशांतने दिल्या भन्नाट प्रतिक्रिया
‘जो रूट चुकला, मग प्रशिक्षकांनी त्याला रणनिती बदलण्यास का सांगितले नाही?’; माजी क्रिकेटरचा निशाणा