भारतीय क्रिकेटरसिकांचे क्रिकेटप्रती असलेले प्रेम जगापासून लपून राहिलेले नाही. त्यातही इंडियन प्रीमियर लीग म्हटलं की चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांची टिव्हीसमोर गर्दी जमते. अनेकजण आपल्या आवडत्या संघाला किंवा क्रिकेटपटूला प्रत्यक्षात पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जातात. त्यातही ‘रनमशीन’ विराट कोहली याचा चाहतावर्ग भारतासहित जगाच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळतो.
पहिल्या आयपीएल सामन्यावेळी विराटच्या चाहत्यांचे त्याच्याप्रती असलेले प्रेम पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात ९ एप्रिल रोजी चेन्नई येथे सामना सुरू होताच अनेकांनी त्याच्या विजयासाठी प्रार्थना केल्या. यावेळचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट नाणेफेकीसाठी मैदानावर गेला असताना एका चाहत्याने टिव्हीवर त्याची आरती ओवाळली. विशेष बाब म्हणजे त्याने हाती आरतीचे ताट न घेता थेट हातावर वात ठेवून त्याची आरती केली. काहींनी नारळ फोडून विराटने सामना जिंकण्यासाठी प्रार्थना केली. तर काहींनी केक आणून पहिल्या आयपीएल सामन्याचा विजयाचा आनंद साजरा केला.
https://twitter.com/KishoreJSP_VK/status/1380331874124320770?s=20
दरम्यान सामन्याचा विचार करायचा झाल्यास, मुंबई इंडियन्सकडून प्रथम फलंदाजी करताना ख्रिस लिनने सर्वाधिक ४९ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने ३१ धावा आणि इशान किशननेही २८ धावांचे योगदान दिले. त्यामुळे मुंबईने २० षटकात ९ विकेट्स गमावत १५९ धावा केल्या. बेंगलोरकडून गोलंदाजी करताना हर्षल पटेलने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात बेंगलोरने ८ विकेट्स गमावत मुंबईचे आव्हान पूर्ण केले आणि २ विकेट्सने सामना खिशात घातला. बेंगलोरकडून एबी डिविलियर्सने सर्वाधिक ४९ धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीने ३३ आणि ग्लेन मॅक्सवेलने ३९ धावांचे योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
फॅन असावा तर असा! बेंगलोरविरुद्ध फलंदाजीला उतरलेल्या रोहितची चाहत्याने केली आरती, पाहा भारी व्हिडिओ
‘हिटमॅन’ची मुंबई इंडियन्स परिवारासोबतची १० वर्षे पूर्ण, फ्रँचायझीने शेअर केला खास व्हिडिओ; पाहा
जिया जले जान जले! ‘मॅक्स’भाऊची आतषबाजी अन् पंजाब किंग्जची मालकिन ट्रोल, पाहा मीम्स