भारत आणि पाकिस्तान या तुल्यबळ संघांमध्ये टी२० विश्वचषक २०२१मधील सामना २४ ऑक्टोबर रोजी खेळाला जाणार आहे. क्रिकेट प्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबद्दलच्या चर्चेला फारसे महत्त्व देत नाही.
विराटने म्हटले आहे की, तिकीटांची प्रचंड मागणी असूनही, पाकिस्तानविरुद्धचा सामना त्याच्यासाठी सामान्य सामन्यासारखाच आहे. तो गमतीने म्हणाला की त्याचे मित्रही त्याच्याकडे या सामन्यासाठी तिकीटं मागत आहेत, पण प्रत्येकाला ‘नाही’ म्हणून सांगावे लागत आहे.
आयसीसी विश्वचषक सामन्यात भारतीय संघाने कधीही पाकिस्तानकडून पराभव पत्करलेला नाही. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणाला आहे की, त्याला खात्री आहे की त्याचा संघ २४ ऑक्टोबरला होणारा सामना जिंकेल. पण, कोहली म्हणाला की असे मोठे दावे करण्यावर विश्वास ठेवत नाही. त्याला भारत-पाकिस्तान या सामन्याबद्दल काही विशेष वाटते का असे विचारले असता, तो म्हणाला, ‘मला असे कधीच काही वाटले नाही.’
विराट पुढे म्हणाला, ‘ मला इतर सामन्यांसारखेच वाटत आहे. मला माहित आहे की या सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये खूप उत्साह आहे. विशेषतः तिकीटांची मागणी आणि विक्रीबद्दलही खूप चर्चा होत आहे.’
तो गमतीत म्हणाला, ‘यावेळी या तिकीटांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत, मला हे एवढेच माहीत आहे. माझे सर्व मित्र माझ्याकडे तिकीटांची मागणी करत आहे आणि मी त्यांना ‘नाही’ म्हणून सांगत आहे.’
विराट म्हणाला, ‘आमच्यासाठी हा फक्त क्रिकेटचा सामना आहे, जो योग्य भावनेनेच खेळला गेला पाहिजे, आणि आम्ही तो खेळू. प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून वातावरण वेगळे दिसत असेल, परंतु खेळाडूंचा दृष्टीकोन हा व्यावसायिक असतो. आम्ही प्रत्येक सामना सामान्य सामन्याप्रमाणे घेतो.’
टी२० विश्वचषकानंतर कोहली या प्रकारातील भारताचे कर्णधारपद सोडणार आहे. याची घोषणा त्याने स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
गंभीर म्हणतो, आयपीएल २०२२मध्ये सीएसकेच्या ‘या’ ३ शिलेदारांना रिटेन करेल; पण धोनी…
टीम इंडिया सावधान! यूएईत पाकिस्तानी खेळाडूंचा राहिलाय बोलबाला, ८ खेळाडूंनी जिंकलेत ५८ सामने
स्टेडियममध्ये न जाता घ्या स्टेडियमसारखा अनुभव, टी२० विश्वचषक सामन्यांचा थरार पाहा आता पीव्हीआरमध्ये