---Advertisement---

विराटची फिटनेस भारीच, पण दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाचने पुढच्या सहा वर्षांसाठी दिला ‘हा’ खास सल्ला

On: मंगळवार, नोव्हेंबर 8, 2022 2:34 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहली सध्या जबरदस्त प्रदर्शन करत आहे. काही महिन्यांपूर्वी ज्या विराटला संघातून बाहेर करण्याची मागणी होऊ लागली होती, त्याने टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी विराटने स्वतःच्या फिटनेसविषयी मोठी प्रतिक्रिया दिली. आता दक्षिण आफ्रिका संघाचा माजी दिग्गज हर्षेल गिब्स देखील विराटच्या फिटनेसमुळे प्रभावित झाल्याचे दिसत आहे. हर्षेलने विराटला पुढच्या सहा वर्षांसाठी एक खास सल्ला देखील दिला आहे. 

विराट कोहली (Virat Kohli) भारतीय संघाचा सर्वात महत्वाचा खेळाडू आहे, असे म्हटले तर काहीच चुकीचे ठरणार नाही. कारण विराट फलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणात देखील जबरदस्त प्रदर्शन करतो. त्याने टी-20 विश्वचषक 2022 मध्येही अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना सर्वांसमोर ठेवला आहे. आशिया चषक 2022 पूर्वी विराट धावा करण्यासाठी झगडताना दिसत होता, पण आता त्याला स्वतःचा जुना फॉर्म पुन्हा मिळाल्याचे दिसते. भारताला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात पोहोचवण्यामध्येही त्याचे योगदान सर्वात मोठे राहिले आहे. विराटे त्याच्या फिटनेसविषयी एक मोठा खुलासा करत सांगितले की, त्याचे वजन मागच्या आठ वर्षांपासून 75 किलो आहे आणि यात जास्त बदल झाला नाहीये.

विराटची हे वक्तव्य पाहून दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज फलंदाज हर्षेल गिब्ज (herschelle Gibbs) प्रभावित झाला आहे. कारण कोणत्याही व्यक्तीसाठी इतके वर्ष स्वतःचे वजन नियंत्रणात ठेवणे सोपी गोष्ट नाही. हर्षेलने स्वतःच्या ट्वीटर खात्यावरून विराट एक सल्ला देत लिहिले की, “पुढचे सहा वर्ष हा उपक्रम असाच सुरू ठेव.” दरम्यान, हर्षल गिब्ज विराटचा आदर्श खेळाडू आहे, असेही सांगितले जाते. असात आवडत्या खेळाडूकडून कौतुक झाल्यानंतर विराटला देखील आनंद होऊ शकतो.

तत्पूर्वी विराटने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, “मला वाटते माझी उंची 5 फुड 11 इंच आहे. मागच्या आठ वर्षांमध्ये माझे वजय 74.5 ते 75 किलो राहिले आहे.” त्याच्या या वक्तव्यानंतर सर्वत्र या मुलाखतीची चर्चा झाली. सर्व क्षेत्रांतील व्यक्त विराटचे कौतुक करताना दिसले. दरम्यान, विराटने टी-20 विश्वचषक आणि त्याआधी ऑगस्ट महिन्यात केलेल्या अप्रतिम फलंदाजीच्या जोसावर मानाचा पुरस्कार देखील मिळवला आहे. आयसीसीने ऑगस्ट महिन्यातील त्याच्या कामगिरीसाठी त्याला प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार दिला आहे. डेविड मिलर आणि सिकंदर रजा यांना मागे टाकत त्याने हा पुरस्कार जिंकला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
उर्वशी प्रकरण पंतच्या आलंय चांगलच अंगलट! आता चाहते तोंडावर म्हणू लागले…
VIDEO: नाणेफेकीच्या वेळी रोहित शर्माच्या मागे अश्विनचे ‘​​असे’ कृत्य कॅमेऱ्यात कैद, भज्जीने केले ट्रोल  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---