इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत आज (१८ एप्रिल) क्रिकेट चाहत्यांना दोन लढती पाहायला मिळणार आहेत. पहिली लढत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात चालू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या दिशेने लागला. नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीने आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली आहे.
मागच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला पराभूत करत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ या सामन्यात विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून मैदानात उतरला आहे. तसेच नाणेफेकी जिंकल्यानंतर विराट कोहलीने म्हटले की, “मी ऑएन मॉर्गनविरुद्ध नाणेफेक जिंकली आहे. हे अविश्वसनीय आहे, आता त्याच्या विरुद्ध नाणेफेकीमध्ये स्कोअर ७-१ असा झाला आहे.”
हे वक्तव्य करण्यामागचे कारण असे की, काही महिन्यांपुर्वी इंग्लंड संघ भारतीय दौऱ्यावर होता. या दौऱ्यावर ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर, इंग्लंड संघाने ५ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळली होती. भारतीय कर्णधाराला यातील दुसऱ्या वनडे सामन्यात शेवटची नाणेफेक जिंकण्यात यश आले होते. त्यानंतर उर्वरित ७ सामन्यात मॉर्गनने नाणेफेक जिंकली होती. त्यामुळे आज विराटने नाणेफेक जिंकल्यानंतर अशी आश्चर्यकारक प्रतिक्रीया दिली होती.
#RCB have won the toss and they will bat first against #KKR in Match 10 of #VIVOIPL.
Follow the game here – https://t.co/OBmT3wfu6G pic.twitter.com/mYaZUcG5WQ
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2021
"I've won the toss against Eoin Morgan. It's unbelievable, it's 7-1 against him now for me". – Virat Kohli.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 18, 2021
असा आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ-
विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पड्डीकल, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, काइल जेमीसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल
असा आहे कोलकाता नाईट रायडर्स संघ-
नितीश राणा, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, ऑएन मॉर्गन (कर्णधार), शाकिब अल हसन, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, हरभजन सिंग, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती
महत्त्वाच्या बातम्या-
‘एवढ्या युवा खेळाडूंना घेऊन खेळल्यानंतर पराभव होणारचं होता,’ दिग्गजाचा कर्णधार वॉर्नरवर निशाणा
RCBvKKR: कोहलीला ‘हा’ किर्तीमान करण्याची संधी, बनू शकतो आयपीएल इतिहासातील पहिलाच फलंदाज