अहमदाबाद कसोटी सामन्यात भारतीय दिग्गज विराट कोहली चमकला. विराटने आपला तीन वर्षांच्या दुष्काळ संपवून कसोटी शतक झळकावले आणि संघाची धावसंख्या उंचावली. विराटच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे त्याचे 75वे शतक असून यासाठी त्याला 500पेक्षा अधिक इनिंग्ज खेळाव्या लागल्या. विराट मागच्या काही वर्षांमध्ये त्याच्या प्रतिक्षेला साजेशे प्रदर्शन करू शकला नाहीये. अशात शेवटच्या 25 शतकांसाठी त्याला पहिल्या 50 शतकांच्या तुलनते जास्त क्रिकेट खेळावे लागला आहे.
बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेचा (BGT) हा चौथा आणि शेवटचा सामना अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियन संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर उस्मान ख्वाजा (180) आणि कॅमरून ग्रीन (114) यांच्या शतकीय योगदानामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात भारतीय संघासाठी शुबमन गिल याने 128 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तसेच रविवारी (12 मार्च) विराट कोहली (Virat Kohli ) यानेही आपले शतक पूर्ण केले. विराटच्या बॅटमधून तब्बल तीन वर्षांपेक्षा अधिक काळानंतर एखादे कसोटी शतक चाहत्यांना पाहायला मिळाले.
विराट कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळलेल्या 552 डावांमधील हे 75 वे शतक होते. एकंतरीत विचार केला, तर विराटला कारकिर्दीतील पहिल्या 50 षतकांच्या तुलनेत शेवटच्या 25 शतकांसाठी अधिक परिश्रम करावे लागले आहेत. त्याने शेवटच्या 25 षतकांसाठी तब्बल 204 आंतरराष्ट्रीय इनिंग्ज खेळल्या. त्याच तुलनते पहिल्या 25 शतकांसाठी विराटला 184 इंनिंग्ज खेळाव्या लागल्या. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 25 ते 50 व्या शतकाच्या काळात विराट सर्वोत्तम फॉर्ममध्ये असल्याचे दिसरे होते. या मधल्या काळात विराटने 164 इनिंग्जमध्ये 25 शतके ठोकली.
आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत विराटला 75 शतके करण्यासाठी खेळाव्या लागलेल्या इनिंग्ज
0 ते 25 शतके – 184 इनिंग्ज
26 ते 50 शतके – 164 इनिंग्ज
51 ते 75 शतके – 204 इनिंग्ज*
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने आपल्या कारकिर्दीतल सर्वाधिक 100 शतके केली. सचिनला या शतकांसाठी एकूण 782 इनिंग्ज खेळाव्या लागल्या. सचिनने कारकिर्दीतील सुरुवातीच्या 75 शतकांसाठी 566 इनिंग्ज खेळल्या होत्या. त्या तुलनेत विराट कोहली सरस ठरतो. विराटने सचिनपेक्षा कमी म्हणजेच 552 इनिंग्जमध्ये स्वतःचे 75 शतक पूर्ण केले आहेत.
दरम्यान, उभय संघांतील या अहमदाबाद कसोटीचा विचार केला, तर चौथ्या दिवसाच्या चहापानापर्यंत भारताने 5 बात 472 धावा केल्या. गोलंदाजी विभागात भारताचा अनुभवी रविचंद्रन अश्विन याने पहिल्या डावात तब्बल 6 विकेट्स नावावर केल्या. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघासाठी फिरकीपटू टॉड मर्फी आणि नेथन लायन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तसेच मॅथ्यू कुह्नेमन यालाही एक विकेट मिळाली. चहापानापर्यंत विराट कोहली नाबाद 135, तर अक्षर पटेल नाबाद 38 धावा करून खेळपट्टीवर कायम होते. (Virat Kohli has played 204 innings for last 25 centuries)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
किंग कोहलीची गर्जना! विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावले शतक, 3 वर्षांचा दुष्काळ अखेर संपवलाच
युवा शुबमनने शतक ठोकताच विराटलाही झाला प्रचंड आनंद, ‘किंग’ कोहलीची रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद