भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका (India vs South Africa Test Series): विराट कोहलीच्या भारतीय संघाला यावेळी दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय संघ फक्त दक्षिण आफ्रिकेत अजूनही कसोटी मालिका जिंकलेला नाही. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेला २६ डिसेंबरपासून सुरुवात होईल.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिका सोबत २६ डिसेंबरपासून पहिला कसोटी सामना खेळणार आहे. यावेळी विराट कोहलीच्या(Virat Kohli) नेतृत्वात भारतीय संघाला आफ्रिकेत मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय संघ १९९२ मध्ये पहिल्यांदा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता आणि अजूनही तिथे मालिका जिंकू शकला नाही. भारताचे सर्वात्तम कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि एमएस धोनीसुद्धा (Mahendra Singh Dhoni) कधी दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकू नाही शकले. तसे अजूनही आफ्रिकेला त्यांच्या घरात हरवणे कठीण आहे. मात्र, विराट कोहली हे करू शकतो.
दक्षिण आफ्रिका संघात सध्या खूप बदल झाले आहेत. २०१३ नंतर संघाला हाशिम अमला (Hashim Amla), एबी डीविलियर्स (AB De Villiers) आणि फाफ डू प्लेसिस (FAF Du Plessis) यांची उणीव भासू लागली. या त्रिकुटाने संघाला खूप कसोटी सामन्यात विजय मिळवून दिले. हाशिम अमला, एबी डीविलियर्स आणि फाफ डू प्लेसिस यांनी भारताविरुद्ध एकत्र २४ सामने खेळले त्यातले १७ सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिका संघाने न्यूझीलंड, भारत, पाकिस्तान यांना २-२ वेळा तर ऑस्ट्रेलियाला एकदा कसोटी मालिकेत हरवले आहे. आफ्रिकेकडे जलद गोलंदाजांचा ताफा आहे. कगिसो रबाडा (Kagiso Rabada), एन्रिक नॉर्किए (Anrich Nortje) आणि लुंगी एनगिडी (Lungi Ngidi) उसळणाऱ्या आणि स्विंग असणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांची परीक्षा घेतील.
दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी कमकुवत वाटत आहे. कर्णधार डीन एल्गारची (Dean Elgar) भारतासमोर सरासरी फक्त ३३ ची आहे. उपकर्णधार टेम्बा बवूमा (Temba Bavuma) आणि क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) हे सुद्धा १९ च्या सरासरीने धावा करू शकले आहेत. एडन मार्करमचे (Aiden Markram) अजून खराब प्रदर्शन आहे. तर क्विंटन डी कॉक शेवटच्या २ कसोट्या वैयक्तिक कारणांमुळे खेळणार नाही.
भारताकडे उत्कृष्ट जलद गोलंदाज
भारतीय संघाकडे जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), मोहम्मद शमी (Mohammad Shami), इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) हा जलद गोलंदाजांचा ताफा आहे. अक्षर पटेल (Axar Patel) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) दुखापतीमुळे ही मालिका खेळणार नाही. त्यामुळे रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) ७ व्या क्रमांकावर अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळेल.
धोनी-गांगुलीचं स्वप्न अर्धवटच
सौरव गांगुली कर्णधार असताना भारतीय संघ २००१ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. तेव्हा भारतीय संघाला १-० ने पराभव स्वीकारावा लागला होता. धोनीच्या कर्णधारपदात भारतीय संघ २ वेळा दौऱ्यावर गेला आहे. भारतीय संघ २०१०-११ मध्ये कसोटी मालिका अनिर्णित ठेवण्यात यशस्वी ठरला होता.
२०१३-१४ मधल्या आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघाला १-० ने पराभव स्वीकारावा लागला होता. विराट कोहलीच्या कर्णधारपदात ३ वर्षांपूर्वी दौरा केला होता तेव्हा २-१ ने भारताला पराभव पत्करावा लागलेला.