दुबई। बुधवारी (२९ सप्टेंबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ४३ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने राजस्थान रॉयल्स संघाला ७ विकेट्सने पराभूत केले. असे असले तरी या सामन्यात बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीची विकेट चर्चेचा विषय ठरली. त्याला रियान परागने धावबाद केले.
विराट ६ वर्षांनंतर धावबाद
झाले असे की राजस्थानने बेंगलोरला १५० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी विराट आणि देवदत्त पडीक्कल सलामीला फलंदाजीला उतरले. पण ६ व्या षटकात मूस्तफिजूरने देवदत्तला २२ धावांवर त्रिफळाचीत केले. त्यानंतर विराटने श्रीकर भारतसह डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला होता.
ख्रिस मॉरिस गोलंदाजी करत असलेल्या ७ व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर विराटने बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने फटका खेळला. पण त्यावेळी क्षेत्ररक्षक रियान परागने चपळाईने चेंडू अडवला. परंतु, चेंडू थोडा दूर गेल्याचे पाहून विराट आणि श्रीकर भारतने चोरटी एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याची किंमत विराटला चूकवाली लागली. कारण परागने लगेचच तो चेंडू हाती घेत थेट नॉन स्ट्रायकर एन्डच्या स्टंपवर फेकला. यावेळी विराट क्रिजमध्ये पोहचला नव्हता. त्यामुळे त्याला २५ धावांवर विकेट गमवावी लागली.
विराट २०१५ सालानंतर पहिल्यांदाच आयपीएलमध्ये धावबाद झाला. तो अखेरचा २०१५ मध्ये ड्वेन ब्रावोकडून धावबाद झाला होता.
व्हिडिओ पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
Super save 👌
Quick recovery 👍
Direct-hit 🎯@ParagRiyan's excellence in the field led to Virat Kohli's run-out 👏👏 #VIVOIPL #RRvRCB @rajasthanroyalsWatch it here 🎥 🔽https://t.co/7F2OdneXzQ
— IndianPremierLeague (@IPL) September 29, 2021
बेंगलोरचा विजय
विराट बाद झाल्यानंतर श्रीकर भारतने ग्लेन मॅक्सवेलसह ६९ धावांची भागीदारी बेंगलोरचा डाव पुढे नेला. पण श्रीकर भारत ४४ धावांवर बाद झाला. पण, त्यानंतर मॅक्सवेलने नाबाद ५० धावा करत बेंगलोरला १७.१ षटकात विजय मिळवून दिला. राजस्थानकडून केवळ मुस्तफिजूरला विकेट्स घेता आल्या. त्याने २ विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी, राजस्थानने सुरुवात चांगली केली होती. त्यांच्याकडून एविन लुईस आणि यशस्वी जयस्वालने ७७ धावांची सलामी दिली होती. लुईसने सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली. तर जयस्वालने ३१ धावा केल्या. पण हे दोघे बाद झाल्यानंतर राजस्थानने नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या. त्यामुळे २० षटकांत त्यांना ९ बाद १४९ धावाच करता आल्या. बेंगलोरकडून हर्षल पटेलने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर, शहाबाज अहमद आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच डॅनिएल क्रिश्चियन आणि जॉर्ज गार्टनने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
‘सुपर फ्लॉप’ रियान पराग आला नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, होतोय जबरदस्त ट्रोल
टी२० विश्वचषकात भारताच्या प्लईंग इलेव्हनमध्ये सीएसकेच्या ‘या’ खेळाडूचा व्हावा समावेश, नेहराचे भाष्य