रविवारी आयसीसी 2019 विश्वचषकाची सांगता झाली. त्यानंतर आयसीसीने सोमवारी वनडे क्रमवारी जाहिर केली आहे. या विश्वचषकादरम्यान संघांची तसेच खेळाडूंची झालेली कामगिरी क्रमवारीसाठी लक्षात घेतली आहे.
या क्रमवारीत विश्वचषक विजेता इंग्लंडचा संघ अव्वल क्रमांकावर कायम आहे. तसेच खेळाडूंच्या वनडे क्रमवारीत मात्र भारतीय खेळाडूंचा दबदबा कायम आहे. फलंदाजी क्रमावारी भारताचा कर्णधार विराट कोहली अव्वल क्रमांकावर तर उपकर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे.
तसेच गोलंदाजी क्रमवारीत जसप्रीत बुमराह अव्वल क्रमांकावर कायम आहे. मात्र बुमराह व्यतिरिक्त पहिल्या 10 मध्ये एकाही भारतीय गोलंदाजाचा समावेश नाही.
भारतीय खेळाडूंबरोबर या क्रमवारी न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या खेळाडूंची क्रमवारीत मोठी प्रगती झाली आहे. 2019 विश्वचषकाचा मालिकावीर ठरलेला केन विलियम्सनने फलंदाजी क्रमवारीत दोन स्थानांची प्रगती करत 6 वे स्थान मिळवले आहे.
त्याने या विश्वचषकात भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्यानंतर कारकिर्दीतील सर्वोत्तम 799 गुण मिळवले होते. पण स्पर्धेच्या अखेरीस त्याचे 796 गुण झाले आहेत. त्याने भारताविरुद्ध 67 धावा केल्या होत्या. तसेच त्याचा संघसहकारी रॉस टेलर 5 व्या क्रमांकावर आहे.
याबरोबरच इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने फलंदाजी क्रमवारीत मोठी झेप घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम 694 गुण मिळवले आहेत. त्याने 5 स्थानांची प्रगती करत 20 वे स्थान मिळवले आहे. 20 व्या स्थानावर त्याच्याबरोबर संयुक्तरित्या इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनही आहे.
त्याचबरोबर इंग्लंडकडून शानदार कामगिरी करणारा जेसन रॉयने पहिल्यांदाच पहिल्या 10 फलंदाजांच्या यादीत प्रवेश केला आहे. त्याने 3 स्थानांची झेप घेत 10 वे स्थान मिळवले आहे.
तसेच भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजानेही न्यूझीलंड विरुद्ध उपांत्य सामन्यात शानदार 77 धावांची खेळी केल्याने फलंदाजी क्रमवारीत 24 स्थानांची मोठी झेप घेतली आहे. तो आता 108 व्या क्रमांकावर आला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ आणि ऍलेक्स कॅरे यांनी प्रत्येकी 2 स्थानांची प्रगती करत अनुक्रमे 29 वे आणि 32 वे स्थान मिळवले आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराह पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट कायम आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर कागिसो रबाडा आला आहे. पॅट कमिन्स आणि इम्रान ताहिर अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.
तसेच या क्रमवारीत इंग्लंडच्या ख्रिस वोक्सने चांगली प्रगती करताना त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम 676 गुण मिळवले असून पहिल्या 10 गोलंदाजांमध्येही स्थान मिळवले आहे. तो आता 6 स्थानांची झेप घेत 7 व्या क्रमांकावर आला आहे.
इंग्लंडकडून या विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा जोफ्रा आर्चरनेही क्रमवारीत चांगली प्रगती केली आहे. त्याने पहिल्यांदाच पहिल्या 30 गोलंदाजांच्या यादीत प्रवेश केला आहे. तो आता 29 व्या स्थानावर आला आहे.
तसेच न्यूझीलंडचा गोलंदाज मॅट हेन्रीने त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे पुन्हा एकदा पहिल्या 10 जणांच्या यादीत स्थान मिळवले आहे. तो आता 10 व्या क्रमांकावर आला आहे.
अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या यादीत बांगलादेशचा शाकिब अल हसन पहिल्या स्थानावर कायम आहे. तसेच दुसऱ्या स्थानावर इंग्लंडचा बेन स्टोक्स कायम आहे. या क्रमवारीत मोहम्मद नबी तिसऱ्या, इमाद वासिम चौथ्या आणि राशिद खान पाचव्या स्थानावर आहे.
संघ क्रमवारीत इंग्लंडपाठोपाठ भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर तर न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे आणि पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–सुपर ओव्हरदरम्यान बेन स्टोक्सने जोफ्रा आर्चरला दिला होता हा खास संदेश
–विश्वचषक२०१९ च्या सर्वोत्तम ११ जणांच्या संघात आयसीसीने केली या दोन भारतीय खेळाडूंची निवड
–…म्हणून मोईन अली, आदील राशिदने घेतला नाही इंग्लंडच्या सेलिब्रेशनमध्ये सहभाग