एडलेड । भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात मंगळवारी (१५ जानेवारी ) दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीने शानदार शतकी खेळी केली. त्याने या सामन्यात ११२ चेंडूत १०४ धावा केल्या. यात त्याच्या ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
या शतकाबरोबर विराटबरोबर एक खास योगायोग घडला. १५ जानेवारी रोजी शतक करण्याचा सिलसिला सलग तिसऱ्या वर्षीही विराटसोबत घडला आहे.
विराटने २०१७मध्ये धावांचा पाठलाग करताना इंग्लंडविरुद्ध पुण्यात वनडेत १२२ धावांची खेळी केली होती. त्यानंतर २०१८मध्ये १५ जानेवारी रोजीच विराटने कसोटीत आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनला १५३ धावांची खेळी केली होता. तर आज १५ जानेवारीलाच विराटने शतकी खेळी केली.
विशेष म्हणजे या तीनही खेळी त्याच्या त्या वर्षातील पहिल्याच शतकी खेळी आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
–जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या स्टार फलंदाजाला केले अफलातून धावबाद, पहा व्हिडिओ
–एमएम धोनीसाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धचा दुसरा वनडे या कारणासाठी आहे खास
–मोहम्मद सिराजचे झाले टीम इंडियाकडून वनडे पदार्पण