---Advertisement---

विराटने उडवली भज्जीची खिल्ली; म्हणतो, पाजी बिल्डींग थरथर कापत आहे

On: बुधवार, मे 27, 2020 5:37 PM
---Advertisement---

नवी दिल्ली । भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज हरभजन सिंगने मंगळवारी (२६ मे) आपला एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये हरभजन आपल्या घराच्या बालकनीमध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे. परंतु, भारतीय संघाचा सर्वात फिट क्रिकेटपटू विराट कोहलीने त्याची खिल्ली उडवली आहे.

हरभजनच्या व्हिडिओवर विराटची कमेंट-

हरभजनने (Harbhajan Singh) आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “व्यायाम तर केलाच पाहिजे.” या व्हिडिओमध्ये हरभजन आपल्या बालकनीत पायांचा व्यायाम करत आहे, त्या दरम्यान त्याचे पाय थरथर कापत होते. त्याचे संतुलन थोडेसे गडबडले होते. असा व्यायाम करताना संतुलन बनवणे कठीण असते. हे विराटने हेरले आणि त्याची थट्टा केली.

विराटने त्याच्या या व्हिडिओवर मजेशीर कमेंट करत लिहिले की, “वेलडन पाजी, परंतु बिल्डींग (पाय) थरथर कापत आहे थोडीशी.”

हरभजनचे विराटला प्रत्युत्तर-

हरभजनने विराटच्या कमेंटचे प्रत्युत्तर दिले आहे. त्याने हसणाऱ्या ईमोजीचा वापर करत कमेंट केली की, “हळू-हळू ती सरळ होईल. हे सर्व संपण्याची वाट बघ. त्यानंतर आपण दोघे सोबत व्यायाम करूया.”

हरभजन आणि विराट दोघेही आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतात. असे म्हटले जात आहे की, ऑक्टोबर महिन्यात होणारा टी२० विश्वचषक जर स्थगित झाला तर त्याऐवजी आयपीएलचे आयोजन केले जाऊ शकते.

https://www.instagram.com/p/CAo5Q0mByoF/?utm_source=ig_embed

हरभजन आयपीएल फ्रंचायझी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाकडून खेळतो तर विराट रॉय चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा कर्णधार आहे. विराटला आतापर्यंत आपल्या आरसीबी संघाला विजय मिळवून देता आलेला नाही.

ट्रेंडिंग घडामोडी-

-युवराजबरोबर क्रिकेट खेळलेले ‘ते’ ७ खेळाडू, जे फारसे कुणाला नाही आता माहित

-लॉकडाऊनमध्ये कोच रवी शास्त्री यांची शमीकडे ‘अजब’ मागणी

-आफ्रिदीचे आणखी एक मोठं विधान; म्हणतो, हरभजन आणि युवराज…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---