---Advertisement---

नेमकं चुकतंय तरी कुठं? विराट ऑफ-स्टंप लाईनबाहेर बाद होण्याबाबत फलंदाजी प्रशिक्षकांचे मोठे वक्तव्य

---Advertisement---

दोन वर्षांपेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे, तरीदेखील विराट कोहली याची (Virat Kohli) शतकाची प्रतीक्षा संपली नाहीये. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचे शतक २०१९ मध्ये बांगलादेश संघाविरुद्ध झळकावले होते. त्यानंतर २०२१ वर्ष संपले. परंतु, विराटला शतक पूर्ण करता आले नाहीये. तो अनेकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जात असलेल्या चेंडूवर झेलबाद होऊन माघारी परतला आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध (South Africa vs India) सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील पुन्हा एकदा तो ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूवर बाद झाला आहे. दरम्यान फलंदाजी प्रशिक्षकांना विराट कोहलीच्या बाद होण्याबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी मोठी प्रतिक्रीया दिली आहे.

भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड (Vikram Rathour)  यांनी चौथ्या दिवसाचा (२९ डिसेंबर) खेळ संपल्यानंतर म्हटले की, “या शॉटने त्याने भरपूर धावा केल्या आहेत. हा धावा करून देणारा शॉट आहे. त्याने तो शॉट खेळला पाहिजे, पण मला वाटते की, जो तुमचा मजबूत पक्ष आहे, तो तुमचा कमकुवत पक्ष देखील बनू शकतो. त्याने हा शॉट खेळताना योग्य चेंडूची निवड केली पाहिजे.”(Vikram Rathour statement on Virat Kohli)

अधिक वाचा – ना शतक ना प्रभाव! २०२१ मध्ये विराट ‘सुपरफ्लॉप’

तसेच त्यांनी धावा करताना संघर्ष करत असलेल्या अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराचे समर्थन केले. त्यांनी म्हटले की, “ते (अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा) आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. खरंच रहाणे बाद होण्यापूर्वी चांगली फलंदाजी करत होता. पुजारा देखील चांगल्या लयीत होता. त्यांनी भूतकाळात अनेक महत्वपूर्ण खेळ्या केल्या आहेत. हा त्यांच्यासाठी खूप कठीण काळ आहे.”

या सामन्यातील पहिल्या डावात अजिंक्य रहाणेने ४८ आणि २० धावांची खेळी केली होती. तर चेतेश्वर पुजारा या सामन्यातील पहिल्या डावात शून्यावर बाद झाला होता. तर दुसऱ्या डावात त्याने १६ धावा केल्या होत्या. सामन्याच्या शेवटच्या दिवशी (३० डिसेंबर) दक्षिण आफ्रिका संघाला विजय मिळवण्यासाठी २११ धावांची आवश्यकता आहे, तर भारताला ६ विकेट्सची गरज आहे.

महत्वाच्या बातम्या :

दिग्गजाने सांगितले इंग्लंडच्या लाजिरवाण्या पराभवाचे खरे कारण; म्हणाला…

कोरोना संक्रमित गांगुलीच्या तब्येतीविषयी आली महत्त्वाची अपडेट; अशी आहे सद्यस्थिती

हे नक्की पाहा : हे आहेत भारतीय गोलंदाज, पण फलंदाजी करताना कसोटीत केलंय शतक

हे आहेत भारतीय गोलंदाज, पण फलंदाजी करताना कसोटीत केलंय शतक | Indian Bowlers Who Made Test Century

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---