वेलिंग्टन। सध्या भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला कर्णधार विराट कोहलीच्या फॉर्मची चिंता सतावत आहे. त्याला या दौऱ्यातील आत्तापर्यंत झालेल्या वनडे, टी20 मालिका आणि पहिल्या कसोटी सामन्यात मिळून केवळ एक अर्धशतक करता आलेले आहे.
काल(24 फेब्रुवारी) भारताला न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात 10 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ 0-1 ने पिछाडीवर आहे. या सामन्यातही दोन्ही डावात मोठ्या धावा करण्यात विराट अपयशी ठरला.
त्याच्या फॉर्मबद्दल हा कसोटी सामना संपल्यानंतर त्याला पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्याने सांगितले की तो त्याच्या फॉर्मची जास्त चिंता करत नाही, तसेच जास्त विचार केला तर केवळ अनावश्यक दबाव वाढेल.
विराट म्हणाला, ‘मी पूर्णपणे ठीक आहे आणि मी खरोखर चांगली फलंदाजी करत आहे. मला असे वाटते की कधीकधी धावा आपण ज्या प्रकारे फलंदाजी करतो त्याप्रमाणे होत नाहीत. कधीकधी असेच होते की आपण सर्वकाही चांगल्याप्रकारे अंमलात आणू शकत नाही.’
‘हे पहा, जेव्हा तूम्ही खूप क्रिकेट खेळता आणि अनेक काळापासून क्रिकेट खेळता, तेव्हा साहाजिकपणे 3-4 डावात तूम्हाला हवी तशी कामगिरी करता येत नाही. जर तुम्ही त्याबद्दल जास्त विचार केला तर त्यामुळे जास्त त्रासच होईल. मला वाटते की आपण अशा वेळी चांगल्या मनस्थितीत राहिले पाहिजे. ‘
त्याचबरोबर पुढे विराट म्हणाला, ‘तूम्ही कायम असाच विचार करु शकत नाही की ‘हे मी नेहमीच केले पाहिजे’. तूम्हाला चांगली कामगिरी करायची असते. पण जर तूम्ही ती करु शकला नाही, तर लगेच तूम्हाला त्रास करुन घ्यायची गरज नाही. तूम्ही तूमच्या कामगिरीचा अभिमान बाळगला पाहिजे, जे मी नेहमी केले आहे. मी आता पुढील कसोटी सामन्यात संघाच्या विजयासाठी योगदान देण्यास उत्सुक आहे.’
तसेच विराट असेही म्हणाला की ‘एक चांगली खेळी केल्यानंतर बाहेरुन येणाऱ्या प्रतिक्रिया बदलतील. पण मी त्याचा जास्त विचार करत नाही. जर मी बाहेरील लोक काय विचार करतात याबद्दल विचार करायला लागलो असतो तर कदाचित मी यावेळी संघाबाहेर असतो.’
न्यूझीलंड विरुद्ध भारत संघातील पुढील कसोटी सामना 29 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान क्राईस्टचर्च येथे होईल.
आजच्याच दिवशी क्रिकेटच्या डाॅनने घेतला होता अखेरचा श्वास
वाचा????https://t.co/pRDeSb7NRK????#म #मराठी #Cricket #DonBradman— Maha Sports (@Maha_Sports) February 25, 2020
टीम इंडियाला पराभूत करणाऱ्या केन विलियमन्सनने केले या दोन खेळाडूंचे कौतूक
वाचा- ????https://t.co/dlEl4fZYVw????#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvNZ— Maha Sports (@Maha_Sports) February 24, 2020