---Advertisement---

दुसऱ्या टी२० सामन्यात या गोष्टी ठरल्या महत्त्वाच्या, कॅप्टन कोहलीचा खूलासा

On: सोमवार, जानेवारी 27, 2020 7:11 PM
---Advertisement---

काल (26 जानेवारी) ईडन पार्क (Eden Park), ऑकलँड (Auckland) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 5 सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेतील दुसरा सामना (2nd Match of 5 Matches T20 Series) पार पडला.

हा सामना भारताने 7 विकेट्सने (Won by 7 Wickets) जिंकला. तसेच मालिकेत 2-0ने (2-0 Lead in Series) आघाडी घेतली आहे. हा सामना जिंकल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या गोलंदाजांची प्रशंसा केली आहे.

“गोलंदाजांनी जबाबदारी घेतली आणि सामन्यावर नियंत्रण ठेवले. मला वाटते की त्यांनी ज्या लाईन आणि लेंथने गोलंदाजी केली ती खूप चांगली होती,” असे सामन्यातील भारताच्या गोलंदाजी प्रदर्शनाबद्दल बोलताना विराट म्हणाला.

तसेच विराटने सांगितले की, आम्ही विकेटच्या एकाच बाजूने गोलंदाजी केली आणि आमचा प्लॅन यशस्वी करून दाखविला. ती एक संघ म्हणून चांगली गोष्ट आहे.

“आम्ही मैदानाचा कोण, खेळपट्टीचा मूड आणि न्यूझीलंडच्या फलंदाजांची रणनीती व्यवस्थितपणे समजून घेतली. आम्हाला काही बदल करावे लागले. मला असे वाटते की रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) चांगली कामगिरी केली,” असे विराट यावेळी म्हणाला.

तसेच, युजवेंद्र चहलनेही (Yuzvendra Chahal) काही प्रमाणात चांगली गोलंदाजी केली.  जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याचबरोबर आम्ही चांगले क्षेत्ररक्षण करत गोलंदाजांचा मदत केली,” असेही गोलंदाजांची प्रशंसा करताना कोहली यावेळी म्हणाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---