---Advertisement---

‘काय होईल जर मी पडलो? पण…’ आऊट ऑफ फॉर्म विराटचा इंस्टाग्राम पोस्टद्वारे टिकाकारांवर निशाणा

On: शनिवार, जुलै 16, 2022 6:38 PM
Virat-Kohli
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली खराब फॉर्मशी झुंजत आहे. त्याला गेल्या ३ वर्षात एकही शतक करता आले नाही. तसेच त्याच्या अर्धशतकी खेळींची संख्याही कमी झाली आहे. याच कारणामुळे त्याला टिकाकारांचा सामना करावा लागत आहे. यादरम्यान विराटने सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर करत त्याच्या टिकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे. विराटने त्याचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यावर इंग्रजी भाषेत एक ओळ लिहिली गेली आहे.

विराटने (Virat Kohli) शुक्रवारी (१६ जुलै) त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर आपला एक फोटो (Virat Kohli Reply Criticism) शेअर केला आहे. या फोटोमध्ये विराट निळ्या रंगाच्या स्वेट शर्ट आणि जिन्समध्ये दिसत आहे. त्याच्या बॅकग्राउंडमध्ये एक काळ्या रंगाच्या पोस्टरवर मोठे पंख काढलेले आहे. त्याच्या बाजूला लिहिलेले आहे की, “काय होईल जर मी पडलो? पण डार्लिंग, काय होईल जर तू उडून गेलास. (What if I fall. Oh but my darling, what if you fly.)” 

विराटच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांसह क्रिकेटपटूंनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. माजी इंग्लिश क्रिकेटपटू केविन पीटरसन यांनी विराटला प्रेरणा देत लिहिले आहे की, तू खूप पुढे जाशील.

https://www.instagram.com/p/CgEMHs-tB6p/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान विराटसाठी सध्या चालू असलेला इंग्लंड दौराही अपेक्षित राहिलेला नाही. तो पहिल्या वनडे सामन्यासाठी उपस्थित नव्हता. त्यानंतर दुसरा वनडे सामना खेळताना तो फक्त १६ धावा करू शकला. तर टी२० मालिकेत २ सामन्यात त्याला फक्त १२ धावा करता आल्या. यातही त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी ११ धावा इतकी राहिली. तत्पूर्वी पाचव्या कसोटी सामन्यातही त्याने निराशाच केली. या सामन्यातील दोन्ही डावात मिळून त्याने फक्त ३१ धावा केल्या होत्या.

याखेरीज विराटच्या आयपीएल २०२२ मधील आतापर्यंतच्या प्रदर्शनावर नजर टाकायची झाल्यास, तिन्ही स्वरूपात मिळून त्याने १५ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये २५.५० च्या सरासरीने तो ४५९ धावाच करू शकला आहे. यादरम्यान त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी ७९ धावा इतकी राहिली आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

जागतिक क्रिकेटमध्ये कुणालाही जमलं नाही, ते ‘या’ पाच भारतीयांनी केलं, विक्रम आजही अबाधित

मँचेस्टर वनडेत ‘रोहितसेने’ची असेल अग्निपरिक्षा, ३९ वर्षांपासून इंग्लंडविरुद्ध जिंकू शकला नाही भारत

निर्णायक सामन्याची वेळ बदलली, वाचा कधी सुरू होणार इंग्लंडविरुद्धचा तिसरा वनडे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---