शुक्रवारी (१५ मे) बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, बीसीसीआय १८ मेपासून भारतीय संघाच्या खेळाडूंना घराबाहेर ट्रेनिंग करण्याची परवानगी देण्याची शक्यता आहे. परंतु कर्णधार विराट कोहली तर ३ दिवसांपूर्वीच आपल्या घराबाहेर पडला आहे.
कोरोना व्हायरसमुळे मागील काही महिने विराट आपल्या घरातील जिममध्ये सराव करत होता. परंतु त्याला घराबाहेर धावताना पाहिले नव्हते. शुक्रवारी विराटने (Virat Kohli) आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तो आपल्या घराच्या बालकनीमध्ये धावताना दिसत आहे.
हा व्हिडिओ पोस्ट करत त्याने लिहिले की, “काम करत राहणे हे जीवन जगण्याचा मार्ग आहे. त्यासाठी व्यवसायाची आवश्यकता नाही. निवड तुमची आहे.”
https://www.instagram.com/p/CANrpF8ljOW/?utm_source=ig_web_copy_link
शुक्रवारी बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरूण धुमाळ यांनी सांगितले होते की, जर सरकारने १८ मेनंतर लॉकडाऊनमध्ये सूट दिली तर भारतीय संघाचे क्रिकेटपटू ट्रेनिंग सुरु करतील. बीसीसीआय आपल्या खेळाडूंना घरातून बाहेर ट्रेनिंग आणि सराव करण्याची परवानगी देईल.
धुमाळ पुढे म्हणाले होते की, कठीण परिस्थितीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे शक्य नाही. त्यामुळे खेळाडूंना घराजवळच्या मैदानावर फलंदाजी किंवा गोलंदाजी सराव करण्याची परवानगी दिली जाईल. या मुद्द्यावर बीसीसीआय विचार करत आहे.
तरीही विराट आणि रोहित शर्माबद्दल बोलताना धुमाळ म्हणाले होते की, विराट आणि रोहित या दोन्ही दिग्गजांना समस्या होऊ शकते. कारण ते मुंबईमध्ये राहतात जिथे कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. परंतु विराटकडे आऊटडोअर ट्रेनिंगसाठी कशाचीही कमतरता नाही. तसेच त्याने ट्रेनिंगची सुरुवात धावण्यापासून केली आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आणि १९ वर्षांचा इरफान पठाण म्हणतं होता, मला पाकिस्तानला पाठवू नका
-टी२० विश्वचषकाबद्दल आहे मोठी बातमी, आता होणार या वेळी स्पर्धेचे आयोजन!
-फक्त महाराष्ट्रीय खेळाडूंना घेऊन केलेली टीम इंडियाची वनडे ड्रीम ११