---Advertisement---

विराट कोहलीच्या ऐतिहासिक ‘ट्रिपल सेंच्युरी’साठी अनुष्का शर्मा आणि परिवार दुबईत दाखल!

On: रविवार, मार्च 2, 2025 9:59 AM
---Advertisement---

भारतीय फलंदाज विराट कोहली आज म्हणजेच रविवार 2 मार्च रोजी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक ऐतिहासिक कामगिरी करणार आहे. आजचा दिवस त्याच्यासाठी खास आहे. या खास दिवसासाठी त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि मोठा भाऊ विकास कोहली दुबईला पोहोचत आहेत. विराटसाठी हा एक खास दिवस आहे. कारण तो आज त्याचा 300 वा एकदिवसीय सामना खेळणार आहे. रविवारी दुबईमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या गट फेरीच्या सामन्यात विराट 300 एकदिवसीय सामने खेळणारा सातवा भारतीय स्टार बनेल.

बहुप्रतिक्षित या सामन्यापूर्वी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का शर्मा आणि विकास कोहली हे विराटच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहतील. “अनुष्का शर्मा आणि विकास कोहली (विराट कोहलीचा मोठा भाऊ) रविवारी विराट कोहलीच्या 300व्या एकदिवसीय सामन्यासाठी दुबईला पोहोचतील,” असे सूत्रांनी सांगितले. विराट कोहली मोहालीमध्ये त्याचा 100वा कसोटी सामना खेळण्यासाठी आला तेव्हा अनुष्का शर्माही त्याच्यासोबत उपस्थित होती. विराट कोहलीला कोणत्याही खास क्षणी त्याच्या पत्नी आणि कुटुंबाला त्याच्यासोबत पाहणे आवडते.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावून आपला फॉर्म सिद्ध केला. अशा परिस्थितीत, 300व्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या बॅटमधून मोठी खेळी झाली तर यात आश्चर्य नाही. कारण त्याने 2023च्या विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात शतक झळकावले होते. तथापि, गेल्या वर्षी खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत विराट किवी संघाविरुद्ध अपयशी ठरला होता. गेल्या सामन्यात विराट कोहलीने त्याचे 51वे एकदिवसीय शतक झळकावले होते आणि 14000 धावांचा टप्पाही ओलांडला होता. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 299 एकदिवसीय सामन्यांमध्ये 14085 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 58.20 आहे. विराट कोहली आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही बनला आहे.

हेही वाचा-

…तर मग सेमीफायनलमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया भिडणार, टीम इंडिया घेणार जुन्या पराभवाचा बदला?
WPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय, संघ प्लेऑफसाठी पात्र, आरसीबीचा सलग चाैथा पराभव
इंझमाम-उल-हकचा भारतावर हल्लाबोल! आयपीएलवर बहिष्काराचे आवाहन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---