---Advertisement---

पहिल्या कसोटीपूर्वी विराटने दाखवली ‘टीम इंडिया’ची एकजूट!

On: रविवार, डिसेंबर 19, 2021 12:26 PM
virat kohli south africa
---Advertisement---

लवकरच भारत आणि दक्षिण आफ्रिका (india vs south africa) हे दोन्ही संघ कसोटी मालिकेसाठी आमने सामने येणार आहेत. या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना २६ डिसेंबर पासून सुरू होईल. दरम्यान हा सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाने जोरदार सराव करायला सुरुवात केली आहे. ज्याची माहिती भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) फोटो शेअर करत दिली आहे.(Virat Kohli instagram post)

विराट कोहलीला गेल्या २ वर्षांपासून शतक झळकावता आले नाहीये. त्यामुळे या दौऱ्यावर तो ही प्रतीक्षा संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तो मैदानावर कसून घाम गाळताना दिसून आला आहे. तसेच त्याने नेट्समध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar pujara), मयांक अगरवाल(mayank Agarwal) आणि केएल राहुल (kl Rahul) या फलंदाजांसोबत चर्चा देखील केली.

https://www.instagram.com/indiancricketteam/p/CXoC4ffg-id/?utm_medium=copy_link

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयने) आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये मयंक अगरवाल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि केएल राहुल फलंदाजीचा सराव करताना दिसून येत आहे. तर आर अश्विन, उमेश यादव आणि जसप्रीत बुमराह गोलंदाजीचा सराव करताना दिसून येत आहेत. बीसीसीआयने हा फोटो शेअर करत कॅप्शन देखील दिले आहे. त्यांनी लिहिले की, “सेंच्युरियनमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाचा सराव..”

तर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने देखील आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्यासह उमेश यादव,मोहम्मद सिराज, ईशांत शर्मा, जयंत यादव, आर अश्विन आणि चेतेश्वर पुजारा दिसून येत आहेत. ज्यावर कॅप्शन म्हणून त्याने “सेशन १ डन ” असे लिहिले आहे.

https://www.instagram.com/p/CXnw1_XlMfH/?utm_medium=copy_link

असा आहे दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा १८ सदस्यीय खेळाडूंचा संघ : विराट कोहली (कर्णधार), प्रियांक पांचाल, केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टिरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.

असे आहे दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत मालिकेचे वेळापत्रक 

कसोटी मालिका :

पहिला कसोटी सामना: २६-३० डिसेंबर २०२१ (सेंच्युरियन)

दुसरा कसोटी सामना : ३-७ जानेवारी,२०२२ (जोहान्सबर्ग)

तिसरा कसोटी सामना: ११-१५ जानेवारी,२०२२ (केपटाऊन)

वनडे मालिका 

पहिला वनडे सामना: १९ जानेवारी,२०२१ (पार्ल)

दुसरा वनडे सामना: २१ जानेवारी,२०२१ (पार्ल)

तिसरा वनडे सामना : २३ जानेवारी, २०२१( केप टाऊन)

महत्वाच्या बातम्या :

बीसीसीआय-विराट वाद रंगला असतानाच वरिष्ठ अधिकाऱ्याचा तडकाफडकी राजीनामा; दिले ‘हे’ कारण

राष्ट्रीय वरिष्ठ हॉकी स्पर्धा: पेनल्टी शूट-आउटमध्ये तमिळनाडूचा पराभव करत महाराष्ट्र उपांत्य फेरीत

अश्विन म्हणतोय, “तो माझा आवडता पाकिस्तानी क्रिकेटपटू”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---