सिडनी | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव स्मिथ हे खेळाडू एकत्र खेळताना दिसू शकतात. ते कांऊटी क्रिकेटमध्ये सरे संघाकडून एकत्र खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
स्टिव स्मिथ, डेविड वाॅर्नर आणि कॅमेराॅन ब्रॅनक्राॅफ्ट या तीन खेळाडूंना आस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने १ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
या तिघांपैकी एका खेळाडूला आपल्या संघासाठी करारबद्ध करण्यात सरे क्लबने रस दाखवला आहे. त्यांच्याकडे एका परदेशी खेळाडूसाठी खाली जागा आहे. त्यात त्यांना या बंदी घातलेल्या खेळाडूंपैकी एक कुणीतरी संघात हवा आहे.
मायकेल डी वेनिटो हे या संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिले असून ते यापुर्वी आॅस्ट्रलियाचे फलंदाजी प्रशिक्षक राहिले आहेत. त्यांनी कांऊटी क्रिकेटच्या या मोसमासाठी वेनिटो यांनी या तिघांपैकी एकासाठी आग्रह धरला आहे.
सरेने यापुर्वी आॅस्ट्रेलियाच्याच मिचेल मार्शला करारबद्ध केले होते परंतू तो दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. त्यामूळे त्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या डीन एल्गारला संघात घेण्यात आले आहे. या मोसमाच्या उत्तरार्धात परदेशी खेळाडूची एक जागा मोकळी होणार आहे.
स्टिव स्मिथ, डेविड वाॅर्नर आणि कॅमेराॅन ब्रॅनक्राॅफ्ट या तिकडीला देशांतर्गत क्रिकेट खेळता येणार नाही परंतू ते क्लब क्रिकेट मात्र खेळू शकतात. आॅस्ट्रेलियामध्ये बंदी असलेल्या खेळाडूंनी परदेशात खेळावे किंवा नाही याबद्दल कोणताही नियम नाही.
त्यामूळे त्यांना कांऊटी क्रिकेटमध्ये खेळायला मिळण्याची मोठी संधी आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही कांऊटी क्रिकेटमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यातही तो सरेकडून खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे सर्व योग जूळून आले तर हे दोन खेळाडू सरेकडून खेळताना दिसतील.