नवी दिल्ली | कोरोना व्हायरसमुळे जागतिक क्रीडा विश्व हादरुन टाकले आहे. जेथे रोज नविन काहीतरी होतं होते असे हे क्रीडा विश्व गेले काही महिने ठप्प झाले आहे.
तरीही आता क्रिकेट विश्वात काही क्रिकेट मालिकांना सुरुवात झाली आहे. खासकरुन इंग्लंडने यात पहिले पाऊल उचलले आहे.
यानंतर काही संघांनी सराव सत्रांचे आयोजन केले आहे. इंग्लंड येत्या काळात पाकिस्तान, आयर्लंड व ऑस्ट्रेलियाबरोबर मालिका खेळणार आहे. बाकी सर्व संघाचं तसं सगळंच तळ्यात मळ्यात आहे.
दरम्यान टी२० विश्वचषक व आशिया कपसारख्या महत्त्वाच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत.
भारतीय संघाने एकत्रितपणे अजूनही सराव सुरु केला नाही. यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया देशाच्या मोठ्या दौऱ्यावरही जायचे आहे. यामुळे आयपीएल व भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा होणे जवळपास नक्की झाले आहे.
यासाठी सराव करताना विराट कोहलीची टीम इंडिया अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर सराव करण्याची शक्यता आहे.
भारतीय क्रिकेट बोर्ड मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद येथे भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापुर्वी सराव शिबीर आयोजीत करण्याची शक्यता आहे. येथे जैव सुरक्षित वातावरणात हे सराव शिबीर घेतले जाऊ शकते.
शुक्रवारी भारतीय क्रिकेट बोर्डाच्या बैठकीत यावर चर्चा झाली. यात बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीपासून धरमशाला व अहमदाबादची चर्चा झाली. यात मोटेरावरील आधुनिक सुविधा पाहता यावर सर्वांचे एकमत झाले.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव शिबीर न लावण्याचे कारण म्हणजे बेंगलोर शहरात असलेल्या कोविड पेंशंटची संख्या होय. मोटेरा हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असून ते नव्याने बांधण्यात आले आहे. ट्रंप जेव्हा भारतात आले होते, तेव्हा येथे त्यांची सभा झाली होती.
वाचा- कर्णधारासह मतभेदांमुळे लवकर संपली ५ दिग्गज खेळाडूंची कारकीर्द; भारताचे हे ३ दिग्गजही...