---Advertisement---

IND vs AUS; भारताला चौथा धक्का! जयस्वाल पाठोपाठ कोहलीही तंबूत

---Advertisement---

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघ पिछाडीवर आहे. मात्र या सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) 86 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. दरम्यान त्याने 4 चौकार लगावले. भारतीय संघाला कोहलीच्या रूपात चौथा झटका बसला.

ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूवर विराट कोहली (Virat Kohli) स्काॅट बोलँडच्या (Scott Boland) चेंडूवर यष्टीरक्षक एलेक्स कॅरीच्या हातात झेलबाद झाला. कोहली फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तो अपेक्षेप्रमाणे खेळू शकला नाही.

भारतासाठी पहिल्या डावात आतापर्यंत स्टार सलामीवीर ‘यशस्वी जयस्वाल’ने सर्वाधिक धावांची खेळी केली. त्याने 118 चेंडूत 82 धावांची शानदार खेळी केली. दरम्यान त्याने 11 चौकारांसह 1 उत्तुंग षटकार ठोकला. विराट कोहली आणि यशस्वी जयस्वाल दोघात चांगली भागीदारी रचली जात होती. दोघंही भारतीय संघाला पुढे घेऊन जात होते, मात्र दोन्ही फलंदाजात धाव घेण्यासाठीचा ताळमेळ न लागल्याने जयस्वाल धावबाद झाला.

महत्त्वाच्या बातम्या-

VIDEO; सुरक्षेचा घेरा तोडून विराटला भेटण्यासाठी थेट मैदानातच धावत सुटला चाहता
मोहम्मद सिराजचे ‘शतक’, बुमराह-आकाशदीपची अवस्था वाईट, गोलंदाजीत भारताची चिंताजनक कामगिरी
‘जोकर’ कोहली… ऑस्ट्रेलियन मीडियाने उडवली विराटची खिल्ली, निर्लज्जपणाची सीमा पार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---