भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात ४ मार्चपासून २ सामन्यांची कसोटी मालिका (2 Matches Test Series) सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहाली (Mohali Test) येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियम येथे होणार आहे. या सामन्यातून भारतीय क्रिकेट एका नव्या युगात प्रवेश करेल. या सामन्यातून ३४ वर्षीय रोहित शर्मा पहिल्या कसोटी कर्णधार म्हणून मैदानात उतरेल. तर ३३ वर्षीय विराट कोहली (Virat Kohli) ७ वर्षांनंतर पहिल्यांदाच केवळ फलंदाज म्हणून कसोटी सामना खेळताना दिसेल.
त्यामुळे हा सामना जितका रोहितसाठी तितकाच विराटसाठीही खास असेल. कारण हा विराटचा कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना असेल. या विशेष सामन्यात शतक ठोकत (Century In 100th Test Match) विराट या सामन्याला चार चाँद लावू शकतो.
विराटने त्याचे शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध कोलकाता येथील दिवस-रात्र कसोटी सामन्यात मारले होते. त्यानंतर त्याने १५ कसोटी सामन्यांतील २७ डावात फलंदाजी केली असून यादरम्यान त्याच्या बॅटमधून एकही शतकी खेळी निघालेली नाही. मात्र त्याने यादरम्यान ६ अर्धशतके केलू असून त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ७९ इतकी राहिली आहे. परंतु कारकिर्दीतील १०० व्या कसोटी सामन्यात शतकाच्या प्रतिक्षेवर पूर्णविराम लावण्याचा मानस विराटचा असेल.
मोहालीलाही विराटच्या शतकाची प्रतिक्षा
मात्र चिंतेची बाब अशी की, मोहालीचे आयएस बिंद्रा स्टेडियम त्या स्टेडियमपैकी एक आहे, जिथे विराटला एकही शतक करता आलेले नाही. त्याने या मैदानावर आतापर्यंत ३ कसोटी सामने खेळले आहेत, यादरम्यान त्याने २ अर्धशतकांच्या मदतीने ४९.७५ च्या सरासरीने १९९ धावा केल्या आहेत. या मैदानावर त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नाबाद ६७ धावा इतकी राहिली आहे. अशाप्रकारे मोहालीलाही विराटच्या शतकाची प्रतिक्षा आहे.
विराटकडे आहे इतिहास रचण्याची संधी
विराटपूर्वी १०० कसोटी सामने खेळण्याची करामत करणारे पहिले खेळाडू इंग्लंडचे माजी दिग्गज कॉलिन काउड्रे हे होते. त्यांनी जुलै १९६८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍशेस मालिकेदरम्यान बर्मिंघम कसोटीत हा पराक्रम आपल्या नावे नोंदवला होता. या सामन्यातील पहिल्या डावात त्यांनी १०४ धावाही जोडल्या होत्या. अशाप्रकारे ते केवळ १०० वा कसोटी सामना खेळणारे जगातील पहिले खेळाडूच बनले नाहीत, तर ते १०० व्या कसोटीत शतक ठोकणारेही पहिलेच फलंदाज राहिले होते. त्यांच्यानंतर आतापर्यंत फक्त ९ खेळाडू शतकी कसोटी सामन्यात शतक करू शकले आहेत. परंतु या ९ खेळाडूंमध्ये एकाही भारतीयाचे मात्र नाव नाही. त्यामुळे विराट ही विलक्षण खेळी करत १०० व्या कसोटीत शतक ठोकणारा (First Indian To Smash Century In 100th Test) पहिलाच भारतीय बनू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
अफगानिस्तानने टाळला क्लीन स्वीप! अखेरच्या वनडेत केली बांगलादेशवर मात; राशिद-गुरुबाज चमकले
मयंक अगरवाल जगतो ‘रॉयल’ आयुष्य! बायको वकील तर सासरे आहेत पोलीस महासंचालक
भारतीय महिला विजयी ट्रॅकवर! सलग तिसऱ्या विजयासह विश्वचषकात उभारणार आव्हान