---Advertisement---

धोनीने षटकार मारत पूर्ण केले शतक; कर्णधार कोहलीची आली अशी प्रतिक्रिया, पहा व्हिडिओ

---Advertisement---

कार्डिफ। मंगळवारी(28 मे) भारतीय क्रिकेट संघाचा 2019 विश्वचषकापूर्वीचा दुसरा सराव सामना बांगलादेश विरुद्ध पार पडला. या सामन्यात भारताने 95 धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात भारताकडून एमएस धोनी आणि केएल राहुलने शतकी खेळी केल्या.

धोनीने या सामन्यात भारताकडून 78 चेंडूत सर्वाधिक 113 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत 8 चौकार आणि 7 षटकार मारले. धोनीने त्याचे हे शतक 73 चेंडूत षटकार मारत पूर्ण केले. त्याने अबु जायेदच्या गोलंदाजी करत असलेल्या 49 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर 90 मीटरचा षटकार मारत त्याचे हे शतक पूर्ण केले.

त्याने हा षटकार मारताच स्टेडियममध्ये जल्लोष झाला. तसेच भारतीय खेळाडूंनी ड्रेसिंगरुममधून उभे राहुन टाळ्या वाजवत धोनीच्या शतकाचा आनंद साजरा केला.

यावेळी धोनीने मारलेला हा षटकार पाहून भारताचा कर्णधार विराट कोहलीलाही त्याच्या भावना लपवता आल्या नाही. त्याने आनंदाने आणि उत्साहाच्या भरात काहीतरी मोठ्याने ओरडत टाळ्या वाजवून धोनीच्या शतकाचा आनंद व्यक्त केला. धोनीच्या शतकानंतर आलेली विराटची ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या सामन्यात धोनीने राहुलबरोबर पाचव्या विकेटसाठी 164 धावांची भागीदारीही रचली. यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 359 धावांचा टप्पा गाठता आला. राहुलनेही शतकी खेळी करताना 99 चेंडूत 108 धावांची खेळी केली. तसेच विराटने 47 धावांची खेळी केली.

बांगलादेशकडून गोलंदाजीमध्ये रुबेल हुसेन आणि शाकिब अल हसनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर मुस्तफिजूर रेहमान, मोहम्मद सैफुद्दीन आणि सब्बीर रेहमानने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

यानंतर 360 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेशला 49.3 षटकात सर्वबाद 264 धावाच करता आल्या. त्यांच्याकडून मुशफिकुर रहिम(90) आणि लिटॉन दासने(73) अर्धशतकी खेळी केल्या.

भारताकडून गोलंदाजीत कुलदीप यादव, युजवेंद्र चहलने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराहने 2 आणि रविंद्र जडेजाने 1 विकेट घेतली.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

केएल राहुल, एम धोनीचा शतकी धमाका, टीम इंडियाने बांगलादेश समोर उभा केला धावांचा डोंगर

या गमतीशीर कारणामुळे कोहलीचे विश्वचषक जिंकणे कठीण, वाचा काय आहे ते कारण

२०१९ विश्वचषक विजेतेपदासाठीच्या प्रबळ दावेदाराबद्दल महान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा म्हणतो…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment