भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आणि त्याची पत्नी अथिया शेट्टी यांनी नुकतेच ‘क्रिकेट फॉर चॅरिटी’ लिलावाचे आयोजन केले होते. गरजू मुलांना शिक्षण देण्याचे काम करणाऱ्या विप्ला संस्थेच्या मदतीसाठी हा लिलाव आयोजित करण्यात आला होता. या लिलावात अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटूंनी त्यांच्या वैयक्तिक वस्तू दिल्या होत्या. त्यापैकी एक विराट कोहलीची जर्सी होती. जी 40 लाख रुपयांना विकली गेली.
विराट कोहलीच्या जर्सीवर सर्वात महागडी 40 लाख रुपयांची बोली लागली होती. तसेच त्याच्यी ग्लोव्हज 28 लाखांची बंपर बोलीसह विकली गेली. भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची बॅट 24 लाख रुपयांना विकली गेली आहे. याशिवाय एमएस धोनीची बॅट 13 तर राहुल द्रविडच्या बॅटसाठी 11 लाख रुपयांची बोली लागली. दरम्यान, केएल राहुलनेही लिलावात आपली जर्सी समाविष्ट केली, जी की 11 लाख रुपयांना विकली गेली.
Kohli’s Jersey – 40 LAKHS.
Kohli’s gloves – 28 LAKHS.
Rohit’s bat – 24 LAKHS.
Dhoni’s bat – 13 LAKHS.
Dravid’s bat – 11 LAKHS.
Rahul’s Jersey – 11 LAKHS.In the auction conducted by KL Rahul & Athiya for helping needy children 👌 pic.twitter.com/jnYxmLkD2p
— Johns. (@CricCrazyJohns) August 23, 2024
केएल राहुल आणि अथिया शेट्टीने सुरू केलेल्या या मोहिमेत जसप्रीत बुमराह, रिषभ पंत आणि संजू सॅमसनही त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घेतले आहेत. एवढेच नाही तर जाॅस बटलर, क्विंटन डी कॉक आणि निकोलस पूरन सारखे आंतरराष्ट्रीय क्रिकेटर देखील या मोहिमेचा भाग बनले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार ‘क्रिकेट फॉर चॅरिटी’ लिलावात एकूण 1.93 कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करताना राहुलने स्वतःचा लिलाव यशस्वी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे आणि हा सर्व पैसा गरजू मुलांच्या शिक्षणासाठी वापरला जाणार असल्याचा आनंद आहे. विप्ला फाऊंडेशनच्या सहकार्याने चालवलेल्या या मोहिमेसाठी लोक राहुल आणि अथियाचे कौतुक आणि कौतुक करत आहेत.
हेही वाचा-
VIDEO: रिझवाननं फेकली बाबरच्या अंगावर बॅट, पाकिस्तानी खेळाडूंचा मैदानातच गोंधळ
काँग्रेसमध्ये सामील होणार विनेश फोगट? भूपिंदर सिंह हुड्डानं केलं मोठं वक्तव्य!
असे 3 खेळाडू, ज्यांच्यासाठी दुलीप ट्रॉफी ठरू शकते टर्निंग पॉइंट; टीम इंडियात मिळू शकते जागा