इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना जोरदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघामध्ये पार पडला. तसेच स्पर्धेतील दुसरी लढत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघांमध्ये पार पडली. या सामन्यापूर्वी कर्णधार कोहलीने हे हंगाम त्याचे कर्णधार म्हणून शेवटचे हंगाम असल्याचे घोषणा केली होती. दरम्यान कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध सामना खेळताच त्याने मोठा पराक्रम केला आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करतो. गेली अनेक वर्ष त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच गेल्या ८ वर्षांपासून तो या संघाचे नियमित नेतृत्व करतोय. परंतु, आरसीबीचे कर्णधार म्हणून हे त्याचे शेवटचे हंगाम असणार आहे. दरम्यान, कोलकाता नाईट संघाविरुद्ध पार पडलेला सामना हा त्याच्या कारकिर्दीतील २०० वा सामना होता. असा पराक्रम करणारा तो आयपीएल इतिहासातील ५ वा खेळाडू ठरला आहे.
यापूर्वी असा कारनामा चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी (२१२), सुरेश रैना(२०१), मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (२०७) आणि कोलकाताचा खेळाडू दिनेश कार्तिक(२०४) यांनी केला आहे. विराटने आपल्या आयपीएल कारकिर्दीत एकूण २०० सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने ३८.० च्या सरासरीने ६०८१ धावा केल्या आहेत. यामध्ये ४० अर्धशतक आणि ५ शतकांचा समावेश आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी हा सामना होता खास
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध पार पडलेला सामना हा कोलकाता नाईट रायडर्स संघाचा आयपीएलमधील २०० वा सामना होता. या २०० सामन्यांमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंनी कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स संघाने दोन वेळेस (२०१२,२०१४) आयपीएल स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.
या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाने २०० सामने खेळले आहेत. यासामन्यापूर्वी त्यांना १९९ सामन्यांपैकी १०० सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर ९५ सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच ४ सामने हे अनिर्णीत राहिले आहेत.
आयपीएलमध्ये २०० सामने खेळणारा कोलकाता चौथाच संघ आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्सने असा कारनामा केला आहे.
सर्वाधिक आयपीएल सामने खेळणारे संघ –
२११ – मुंबई इंडियन्स
२०४ – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
२०२ – दिल्ली कॅपिटल्स
२०० – कोलकाता नाईट रायडर्स
१९८ – पंजाब किंग्स
१८७ – चेन्नई सुपर किंग्स
१६८ – राजस्थान रॉयल्स
१३१ – सनरायझर्स हैदराबाद
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडिया २०२१-२२ मध्ये मायदेशात खेळणार तब्बल १४ टी२०, ४ कसोटी अन् ३ वनडे, पाहा संपूर्ण वेळापत्रक