---Advertisement---

श्रेयस अय्यरच्या ‘त्या’ षटकारावर अशी होती कॅप्टन कोहलीची रिऍक्शन

On: बुधवार, जानेवारी 8, 2020 1:06 PM
---Advertisement---

इंदोर। मंगळवारी(7 जानेवारी) होळकर क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका संघात दुसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 7 विकेट्सने विजय मिळवत टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी झाली.

या भागीदारीदरम्यान अय्यरने 17 व्या षटकातील वनिन्दू हसरंगाने टाकलेल्या शेवटच्या चेंडूवर लाँग-ऑनच्या दिशेला मोठा षटकार मारला. हा षटकार मारताना अय्यरने चेंडूवर इतका जोरदार प्रहार केला होता की चेंडू थेट स्टेडियमच्या छताएवढ्या उंचीवर गेला.

अय्यरला स्वत:च मारलेला हा फटका पाहून आश्चर्य वाटले. त्याच्याबरोबरच हा षटकार पाहून नॉन स्ट्रायकर एन्डवर असलेला कोहलीही हैरान झाला. या दोघांच्याही चेहऱ्यावर हा अविश्वसनीय षटकार असल्याचे भाव होते. या क्षणाचा व्हिडिओ बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर शेअर केला असून हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

https://twitter.com/Vijay__Kohli_18/status/1214590838673694721

https://twitter.com/SharukhMSD_/status/1214586953376485377

या सामन्यात कोहलीने 17 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 30 धावा केल्या. तर अय्यरने 26 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकारासह 34 धावा केल्या. तसेच शिखर धवनने 32 धावांचे आणि केएल राहुलने 45 धावांचे योगदान दिले. त्यामुळे भारतीय संघाने श्रीलंकेने दिलेल्या 143 धावांच्या आव्हानाचे लक्ष्य 17.3 षटकात 3 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले.

तत्पूर्वी श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 9 बाद 142 धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून कुशल परेराने सर्वाधिक 34 धावा केल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---