भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने गुरुवारी (१६ सप्टेंबर) रोजी भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. आगामी टी२० विश्वचषकात तो भारताचे अखेरच्या वेळी नेतृत्व करेल. विराटने केवळ टी२० संघाचे नेतृत्व सोडून वनडे संघाचे नेतृत्व सुरक्षित केल्याचे देखील बोलले जातेय. मात्र, विराटने हा निर्णय घेण्यामागे एक महत्त्वपूर्ण कारण असल्याची माहिती समोर येतेय.
या कारणाने विराटने राखले वनडे कर्णधारपद
विराटने टी२० संघाच्या कर्णधारपदाचा त्याग केला असला तरी, वनडे व कसोटी क्रिकेटमध्ये तो भारताचे नेतृत्व करेल. विराटच्या या निर्णयामागे ब्रँड व्हॅल्यू न घसरणे हा निर्णय असल्याचे बोलले जात आहे. सर्व प्रकारच्या संघाचे नेतृत्व सोडल्यास आपल्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये कमी होईल, असे त्याला वाटत असेल, असा प्राथमिक अंदाज लावला जातोय.
तज्ञांनी सांगितली दुसरी बाजू
विराटने ब्रँड व्हॅल्यूमूळे पूर्णपणे नेतृत्व न सोडल्याच्या आरोपावर तज्ञांनी वेगळी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्यामते या गोष्टीचा विराटच्या ब्रँड व्हॅल्यूवर परिणाम होणार नाही. सचिन तेंडुलकर हा निवृत्त होऊन ८ वर्ष झाले असले तरी, आजही तो अनेक मोठ्या ब्रँडचा ब्रँड अँबेसिडर आहे. अशीच गोष्ट माजी कर्णधार एमएस धोनीबाबतही लागू होते.
आरसीबीचे नेतृत्व करेल विराट
विराट आता आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. त्याच्या संघाने आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या पहिल्या टप्प्यात ७ पैकी ५ सामने जिंकले असून ते गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या खात्यावर दहा गुण जमाआहेत. विराट त्याच्या नेतृत्वाखाली संघाला प्रथमच आयपीएल विजेता बनवण्याचा प्रयत्न करेल. हंगामाचा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून सुरू होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
सेहवाग म्हणतोय, ‘…तर मी आरसीबीच्या युवा खेळाडूला टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान देईल’
स्टुअर्ट बिन्नी सुरू करणार नवी कारकीर्द, फोटो शेअर करत दिली माहिती
हैदराबादसाठी करा किंवा मराची स्थिती, राशीद खान म्हणतोय, ‘पुन्हा एकत्र आलोय, आता प्रत्येक सामना…’