भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सोमवारी (4 सप्टेंबर) नेपाळविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करू शकला नाही. या सामन्यात भारताची सलामीवीर जोडी रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही शेवटपर्यंत नाबाद राहिली आणि त्यांनी संघाला विजय देखील मिळवून दिला. विराटने या सामन्यात फलंदाजी केली नसली, तरी तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कारण आहे त्याने लाईव्ह सामन्यात केलेला डान्स.
नेपाळविरुद्धच्या या सामन्यात भारताला 231 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण पावसामुळे ले लक्ष्य पंचांनी 23 षटकात 145 धावांचे केले. तत्पूर्वी नेपाळ संघाने मात्र आपल्या वाडाच्या 50 षटकांमध्ये फलंदाजी केली होती. यादरम्यानच विराट कोहली क्षेत्ररक्षण करत असताना त्याला स्टॅन्डमधून नेपाळी गाण्याचा आवाज आला. हे काणे विराटला चांगलेच भावले, ज्यामुळे दिग्गज फलंदाज थेट नाचू लागला.मैदानात उपस्थित चाहत्यांकडे पाहून विराट नाचत होता, जो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Virat Kohli loving the Nepalese songs.
What a guy! 😂❤️ #AsiaCup2023 https://t.co/kTdEGp66VK
— Saif Ahmed 🇧🇩 (@saifahmed75) September 4, 2023
दरम्यान, उभय संघांतील या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर नेपाळने प्रथम फलंदाजी केली. 48.2 षटकांमध्ये 230 धावा करून नेपाळ संघ सर्वबाद झाला. सलामीवीर कुशल भुर्टेल याने 38, तर असिफ शेख याने 58 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्याचसोबत आठव्या क्रमांकावर आलेला सोमपाल कामी यानेही 48 धावा कुटल्या. भारतासाठी मोहम्मद सिराज आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. मात्र, दोघांनी धावा देखील चांगल्याच खर्च केल्या. सिराजने 6.33च्या इकॉनॉमी रेटने 61, तर जडेजाने 4.0 च्या इकॉनॉमीने 40 धावा खर्च केल्या. मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या आणि शार्दुल ठाकूर यांनीही प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
भारतीय संघ फलंदाजीला आल्यानंतर नेपाळच्या सात पैकी एकाही गोलंदाजाला विकेट मिळाली नाही. रोहित शर्मा याने 74, तर शुबमन गिल याने 67 धावा करून संघाला अवघ्या 20.1 षटकात विजय मिळवून दिली. (Virat Kohli performed on Nepal’s popular song in a live match, the video went viral)
महत्वाच्या बातम्या –
‘हिटमॅन’सारखा कुणीच नाही! Asia Cupमध्ये रोहितने घडवला इतिहास, बनला सर्वाधिक षटकार मारणारा अव्वल भारतीय
Asia Cup 2023मधून मोठी बातमी! Super- 4 फेरीतील सामन्यांबद्दल घेतला ‘हा’ निर्णय, INDvPAK सामना होणार फिक्स