---Advertisement---

कसोटी कर्णधार म्हणून ‘मॅरेथॉन’ राहिली विराटची कारकीर्द; तब्बल ‘इतकी’ वर्ष खांद्यावर वाहिली नेतृत्वाची पालखी

On: रविवार, जानेवारी 16, 2022 6:50 AM
virat-kohli
---Advertisement---

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली (virat kohli) याने शनिवारी (१५ जानेवारी) सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. काही महिन्यांपूर्वी त्याने टी२० आणि एकदिवसीय कर्णधारपद सोडले होते. आता दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव मिळाल्यानंतर विराटने कसोटी संघाचे देखील कर्णधार सोडण्याचा निर्णय घेतला. विराटच्या कसोटी कर्णधाराच्या सात वर्षाच्या कार्यकाळाता भारताने उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली.

विराटने कसोटी कर्णधारपद सोडण्याबद्दल सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे. त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘संघाला योग्य मार्गाने पुढे नेण्यासाठी गेली ७ वर्षे कठोर परिश्रम, चिकाटीने प्रयत्न केले. मी प्रामाणिकपणे काम केले आणि यात कसलीही कसर सोडलेली नाही. पण प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर थांबली पाहिजे. आणि भारताचा कसोटी कर्णधार म्हणून थांबण्याची माझी वेळ आली आहे.’

विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीचा विचार केला तर ती सात वर्षांपेक्षा लांब आहे. भारतीय संघाच्या इतिहासातील विराट चौथा कसोटी कर्णधार ठरला आहे, ज्याने सर्वात जास्त काळापर्यंत संघाचे नेतृत्व केले. सर्वात जास्त काळापर्यंत भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व सांभाळणाऱ्यांमध्ये मंसूर अली खान पतौडी यांचे नाव आहे. पतौडींनी १९६२ ते १९७५ या काळात कसोटी संघाचे नेतृत्व केले. त्यांचा एकूण कार्यकाल १२ वर्ष आणि ३१३ दिवसांचा होता.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मोहम्मद अजहरुद्दीन आहेत. त्यांनी १९९० ते १९९९ दरम्यान ९ वर्ष आणि २७ दिवस भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व केले. यादीत तिसऱ्या क्रमांकावर सुनील गावसकर आहेत, ज्यांनी १९७६ ते १९८५ दरम्यान ८ वर्ष आणि १३ दिवसी कसोटी संघाचे नेतृत्व केले. विराट कोहली या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. विराटने २०१४ ते २०२२ दरम्यान ७ वर्ष आणि ३७ दिवस कसोटी संघाचे कर्णधारपद सांभाळले. एमएस धोनी या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. धोनीने २००८ पासून २०१४ पर्यंत एकूण ६ वर्ष आणि २६४ दिवस भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व केले.

दरम्यान, विराटने कर्णधरापदाचा राजीनामा देताना बीसीसीआयचे, माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, संघाचा सपोर्ट स्टाफ यांचे आभार माने. धोनीने २०१४ मध्ये कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर विराटकडे ही जबाबदारी सोपवली होती. कर्णधारपदासाठी पात्र समजण्यासाठी विराटने धोनीचे देखील आभार मानले.

महत्वाच्या बातम्या –

पीकेएलमध्ये शनिवारी रंगला ‘ट्रिपल पंगा’! दिल्ली, युपीचे विजय; मुंबा-बंगाल यांच्यात थरारक टाय

पाचवी ऍशेस कसोटी दुसऱ्याच दिवशी रोमांचक अवस्थेत; स्मिथच्या खांद्यावर ऑस्ट्रेलियाची जबाबदारी

विराटने राजीनामा पोस्टमध्ये उल्लेख केलेल्या त्या दोन व्यक्ती कोण? का घेतली त्यांची नावे? वाचा सविस्तर

व्हिडिओ पाहा –

क्रिकेट अंपायर्सला मिळणारे मानधन| Cricket Umpire Salary

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---