---Advertisement---

‘या’ कारणाने WTC फायनलमध्ये दिली अश्विन-जडेजाच्या फिरकी जोडीला संधी, विराटने केला खुलासा

On: शनिवार, जून 19, 2021 10:05 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना साऊथॅम्प्टन येथे खेळला जात आहे. पहिला दिवस पावसामुळे धुवून गेल्यावर दुसर्‍या दिवशी नाणेफेक झाली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने पाऊस आणि परिस्थिती पाहता प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाच्या अंतिम अकरामध्ये दोन फिरकीपटूंना का संधी दिली गेली, याचा खुलासा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेकीनंतर केला.

विराटला हवी होती प्रथम गोलंदाजी
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला जेव्हा विचारले गेले की, नाणेफेक जिंकली असती तर, काय करायला आवडले असते? या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने गोलंदाजी म्हटले. मात्र, प्रथम फलंदाजी आल्यानंतरही तो निराश दिसला नाही.

दोन फिरकीपटूंना या कारणाने दिली संधी
विराटने या ऐतिहासिक सामन्यासाठी भारतीय संघात रविचंद्रन आश्विन व रवींद्र जडेजा या दोन फिरकीपटूंना संधी दिली. त्या निवडीविषयी बोलताना विराट म्हणाला, “आमचे दोन्ही फिरकीपटू अनुभवी आहेत. त्यांना प्रत्येक प्रकारच्या परिस्थितीत गोलंदाजी कशी करावी हे माहित आहे. खेळपट्टीवर थोडा ओलावा असेल तर आम्ही त्याचा नक्कीच फायदा घेऊ. चांगल्या लाईन लेंथने गोलंदाजी करत हे दोघेही आपली निवड सार्थ ठरवतील. प्रथम फलंदाजी करताना आम्ही धावफलकावर मोठ्या धावा लावण्याचा प्रयत्न करू.”

साऊथॅम्प्टन येथील वातावरण सध्या वेगवान गोलंदाजांना पोषक आहे. त्यामुळे, न्यूझीलंडने चार प्रमुख वेगवान गोलंदाजांसह एक मध्यमगती गोलंदाज खेळवला असून, संघात एकही फिरकीपटू नाही.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा व जसप्रीत बुमराह.

महत्त्वाच्या बातम्या –

विराट-विलियम्सनने खोलला मैत्रीचा पेटारा, एकमेकांबद्दल व्यक्त केला अशा भावना, व्हिडिओ व्हायरल

जॅक कॅलिसला मागे टाकत कोहलीने मिळवले दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

भारतीय प्रशिक्षकाने केली रोनाल्डोची नक्कल; व्हिडिओ भन्नाट व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---