भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम सजलं आहे. हा विश्वचषक 2023 स्पर्धेतील 12वा सामना आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. अशात नेहमीप्रमाणे अनेक खेळाडूंना विक्रम रचण्याची आणि मोडण्याची संधी आहे. या खेळाडूंमध्ये विराट कोहली याच्या नावाचाही समावेश आहे. कदाचित विराटकडे सचिन तेंडुलकर याचा विश्वविक्रम मोडण्याची कारकीर्दीतील अखेरची संधी असू शकते. चला तर, काय आहे तो विक्रम जाणून घेऊयात…
काय आहे विक्रम?
खरं तर, विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या नावावर आहे. सचिनने 1992 ते 2011 यादरम्यानच्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध 5 सामने खेळताना खेळताना 78.25च्या सरासरीने 313 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 3 अर्धशतके चोपली आहेत. यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या 98 राहिली आहे.
पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या पाच खेळाडूंचा विचार केला, तर सचिनव्यतिरिक्त यामध्ये दुसऱ्या स्थानी विवियन रिचर्ड्स, तिसऱ्या स्थानी डेसमंड हेन्स, चौथ्या स्थानी विराट कोहली आणि पाचव्या स्थानी मार्टिन क्रो आहेत. रिचर्ड्स यांनी 1975 ते 1987 दरम्यानच्या विश्वचषकात 5 सामन्यात 253 धावा, हेन्स यांनी 1979 ते 1992 दरम्यानच्या विश्वचषकात 5 सामन्यात 249 धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त चौथ्या स्थानी असलेल्या विराट कोहली (Virat Kohli) याने 2011 ते 2019 दरम्यानच्या विश्वचषकात फक्त 3 सामन्यात 193 धावा केल्या आहेत. तसेच, पाचव्या स्थानी असलेल्या मार्टिन यांनी 1983 ते 1992 दरम्यानच्या विश्वचषकात 4 सामन्यात 171 धावा केल्या आहेत.
विराटकडे विक्रम मोडण्याची संधी
अशात विराट सोडून हे चारही खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. अशात विराटकडे या विश्वचषकात सचिनचा विक्रम मोडण्याची संधी आहे. विराट आणि सचिन यांच्यात 120 धावांचे अंतर आहे. जर विराटने या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध 120 धावांहून अधिक धावा केल्या, तर तो सचिनचा विक्रम मोडण्यात यशस्वी ठरू शकतो.
आता पाकिस्तानविरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणाऱ्या महामुकाबल्यात विराट कोहली कशी धमाल करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (Virat’s last chance to break Sachin’s record? know here what the record is)
हेही वाचा-
अहमदाबादमध्ये ‘या’ 5 भारतीयांनी ठोकल्यात सर्वाधिक धावा, 3 झालेत निवृत्त, तर दोघे पाकिस्तानविरुद्ध भिडणार
विश्वचषकात भारताचा पाकिस्तानविरुद्ध 7-0चा तगडा रेकॉर्ड, पण रोहितची हैराण करणारी प्रतिक्रिया; म्हणाला…