जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी ऑलिम्पिक जपानची राजधानी टोकियो येथे सुरु आहे. या स्पर्धेमध्ये भारताने आतापर्यंत केवळ एक रौप्यपदक पटकावले असून, मिराबाई चानूने वेटलिफ्टिंग प्रकारात स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी ते मिळवून दिले होते. मात्र, इतर खेळाडूंची कामगिरी या ऑलिम्पिकमध्ये अतिशय निराशाजनक होत भारताचे सर्व जलतरणपटू स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर एका चाहत्याने त्यांना ट्रोल केल्यावर भारताचा माजी जलतरणपटू वीरधवल खाडेयाने सोशल मीडियावरून त्याला सडेतोड उत्तर दिले.
भारताचे जलतरणपटू ऑलिम्पिकमधून बाहेर
भारताची एकमेव महिला जलतरणपटू माना पटेल व पुरुष जलतरणपटू श्रीहरी नटराजन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर पडल्यानंतर भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. यापूर्वी साजन प्रकाश हा देखील उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकला नव्हता.
चाहत्याने केले ट्रोल
भारतीय खेळाडूंचा या खराब कामगिरीनंतर एका चाहत्याने ट्विट करत म्हटले, ‘आपल्या खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये पाठवणे थांबवा. हे काही छोटी स्पर्धा नाही. ते स्वतः उत्कृष्ट कामगिरी देखील गाठू शकत नाहीत. ट्युनिशियाकडून काहीतरी शिका.’
या प्रकारावर भारताचा माजी ऑलिम्पिक जलतरणपटू वीरधवल खाडे याने प्रतिक्रिया देताना म्हटले, ‘तुम्हाला घरात बसून कमेंट करणे सोपे वाटते. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली प्रत्येक सामन्यात शतक करत नाहीत. मग बीसीसीआय विराटला घरी बसवणार का?’
So your solution is not to send players, so they never get ready ?
It's quite easy to sit at home and comment . I'm pretty sure even players like Sachin Tendulkar and Virat Kohli don't score a 100 in every match . Maybe BCCI should consider dropping Virat 🤔— Virdhawal Khade OLY (@virdhawalkhade) July 26, 2021
यावर त्या चाहत्याने प्रत्युत्तर देत लिहिले, ‘क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. इतर देशांचे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होताना आपल्या कामगिरीत सुधारणा करतात. आपले खेळाडू स्वतःच्या सर्वोत्तम कामगिरीपर्यंत देखील पोहोचत नाहीत. ट्युनिशियासारख्या लहान देशानेदेखील सुवर्णपदक आपल्या नावे केले आहे.’
https://twitter.com/optimus_64/status/1419887068260405254
वीरधवलने अखेरचे उत्तर देत लिहीले, ‘त्यांनी २००४-२००८ मध्ये मेडल जिंकण्यास सुरुवात केली. अहमद त्यांचा एकमेव पदकविजेता नाही. एकदा पदक जिंकल्यास लोक त्यांचे अनुकरण करतात. क्रिकेट सांघिक खेळ असला तरी त्यात वैयक्तिक कामगिरी महत्त्वाची ठरते.’
Their medal journey started in 2004 . 2008 , ous mellouli from Tunisia won a gold medal .
Ahmed isn't the first medallist . After you have someone break into the top , others will follow .
Cricket is a team event yes but your individual performance is your business .— Virdhawal Khade OLY (@virdhawalkhade) July 26, 2021
भारताचा प्रमुख जलतरणपटू राहिला आहे वीरधवल
महाराष्ट्राच्या वीरधवल खाडे याने २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताचे ५०, १०० व २०० मीटर फ्रिस्टाईल प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. २०१० राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने कांस्य पदक मिळवलेले. त्याला भारत सरकारने अर्जुन पुरस्काराने गौरवान्वित केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
इशान किशन, संजू सॅमसन नव्हे तर ‘हा’ फलंदाज करणार दुसऱ्या टी२० सामन्यात यष्टीरक्षण?
पुन्हा एकदा मंधनाची तुफानी फलंदाजी, १५६ च्या स्ट्राईक रेटने धावा करत जिंकून दिला सामना
पुण्याचा ऋतुराज गायकवाड दुसऱ्या टी२० सामन्यातून पदार्पण करण्याची शक्यता, ‘हे’ आहे मोठे कारण