---Advertisement---

टी२० विश्वचषकात विराट नव्हे तर ‘हे’ तिघे ठरतील भारताचे सर्वश्रेष्ठ फलंदाज, माजी दिग्गजाचे सुचक भाष्य

On: मंगळवार, जून 28, 2022 5:50 PM
Ishan-Kishan-Virat-Kohli
---Advertisement---

आयर्लंड आणि भारत यांच्यातील पहिला टी२० सामना रविवारी (२६ जून) डबलिनमध्ये खेळला गेला. दोन सामन्यांच्या या टी२० मालिकेतील पहिला सामना भारताने ७ विकेट्सने जिंकला. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ उशीरा सुरु झाला, त्यामुळे प्रत्येकी १२ षटकांचा खेळ खेळवला गेला. ज्यामध्ये फलंदाजीला आमंत्रित झाल्यावर आयर्लंडने १२ षटकात १०९ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीला आलेल्या इशान किशनने दमदार फटकेबाजी करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली.

इशानच्या फलंदाजीवर भाष्य करताना भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी त्याला भारताच्या तीन सर्वश्रेष्ठ फलंदाजांपैकी एक सांगितले आहे.

सेहवागला टी२० विश्वचषकातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांबद्दल विचारले गेल्यावर तो म्हणाला, ‘माझ्यासाठी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी भारताचे तीन सर्वश्रेष्ठ फलंदाज निवडायचे झाल्यास वैक्तिकरित्या रोहित शर्मा, केएल राहुल आणि इशान किशन हे तीन खेळाडू माझ्यासाठी महत्वाचे ठरतील. खरतर कोहली टी२० स्वरुपात तीन नंबरवर फलंदाजी करतो, मात्र मी रोहित, राहुल आणि इशान किशन यांना पहिले तीन फलंदाज म्हणून खेळताना बघु इच्छितो. माझ्या मते रोहित आणि किशन यांनी सलामीला यावे जेणेकरुन उजव्या आणि डाव्या हाताच्या खेळाडूंचा असल्याचा फायदा भारतीय संघाला होऊ शकतो. त्यानंतर माझ्यामते राहुल फलंदाजीला यावा.’

तो पुढे म्हणाला, ‘ऑस्ट्रेलियातील खेळपट्टया या उसळी घेणाऱ्या असुन त्यावर वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. त्यामुळे भारताचा नवीन उभरता सितारा उमरान मलिक याला विश्वचषकाच्या भारतीय संघात स्थान देण्यात यावे. उमरान, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे तिघे भारताचे मुख्य वेगवान गोलंदाज असावे असे मला वाटते. उमरानने मला खूप प्रभावीत केले आहे. यावर्षीच्या आयपीएलमध्ये अनेक खेळाडुंनी चांगले प्रदर्शन केले. मात्र उमरानमधील कौशल्य आणि त्याच्यातील प्रतिभामुळे तो क्रिकेटच्या तीनही प्रकारात खेळू चांगले प्रदर्शन करु शकतो.

भारतीय संघाचे वरिष्ठ खेळाडू इंग्लंडविरुद्ध १ जुलैपासून सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज होत आहेत. तर दुसरीकडे भारतीय संघाची आणखी एक तुकडी सध्या आपल्या काही युवा खेळाडुंना घेऊन आयर्लंड दौऱ्यावर २ टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतासाठी उमरान मलिकने पदार्पण केले, मात्र त्याने टाकलेल्या एका षटकांत १४ धावा खर्च केल्या. तर मालिकेचा दुसरा सामना २८ जुन रोजी डबलिनमध्ये खेळला गेला. पहिला सामनाही तिथेच खेळला गेला होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

काहीतरी शिजतंय? इंग्लंडच्या महिला क्रिकेटरसोबत लंडनमध्ये फिरतोय अर्जुन, डिनर डेटचे फोटो चर्चेत

२००७नंतर भारताचे जिंकण्याचे स्वप्न स्वप्नच राहणार, बेन स्टोक्सने केला विश्वास व्यक्त

ENGvsIND: ८६ कसोटींचा अनुभव असलेल्या गोलंदाजाला मिळणार का संधी? भारतीय संघापुढे मोठा प्रश्न

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---