मंगळवारी रात्री (१० नोव्हेंबर) दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या आयपीएल २०२० च्या अंतिम सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सने, प्रथमच अंतिम फेरीत खेळत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला पाणी पाजत; आपले सलग दुसरे आयपीएल विजेतेपद पटकावले. या विजेतेपदासह मुंबई इंडियन्सच्या एकूण आयपीएल विजेतेपदाची संख्या पाच झाली आहे. या पाचही विजेतेपदावेळी मुंबईचा कर्णधार असलेल्या रोहित शर्मावर जगभरातील क्रिकेट समीक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मुंबईच्या या कामगिरीवर भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग भलताच खुश झालाय. सेहवागने ट्विट करून मुंबई इंडियन्सचे अभिनंदन केले.
मुंबईच्या विजयानंतर सेहवागने मध्यरात्री ट्विट केले. या ट्विटमध्ये मुंबई इंडियन्सचे कौतुक करताना सेहवागने लिहीले, ”मुंबई इंडियन्सला अशा विजयांची सवय लागली आहे. व्यवसायिक टी२० लीगमधील जगातील सर्वोत्तम संघ आणि टी२० क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट कर्णधार. या विजयाचे हकदार मुंबई इंडियन्स. कोई शक ! अनेक अडथळ्यांनंतरही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली.”
Ab to aadat si hai sabko aise dhone ki.
The best T 20 franchisee in the world and the best captain in the format. Deserving winners , Mumbai Indians, koi shak.
Amazingly well organised tournament despite various challenges.#IPLfinal pic.twitter.com/yYkRqKtoxQ— Virender Sehwag (@virendersehwag) November 10, 2020
अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना १५६ धावा उभारल्या होत्या. दिल्लीकडून कर्णधार श्रेयस अय्यर व रिषभ पंत यांनी अर्धशतके झळकावलेली. मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने घातक गोलंदाजी करत दिल्लीच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. प्रत्युत्तरात, कर्णधार रोहित शर्माच्या ६८ व इशान किशनच्या नाबाद ३३ धावांच्या जोरावर मुंबईने पाच गडी राखून सामना खिशात घातला आणि विजेतेपद आपल्या नावे केले. अंतिम सामन्यात सामनावीर म्हणून ट्रेंट बोल्टची निवड करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या –
एकच फाईट !! ‘हा’ पट्ट्या ठरला आयपीएलच्या अंतिम सामन्यात ‘मॅचविनर प्लेअर’
…आणि रोहितने दोन मिनिटात केली सुनील गावसकरांची बोलती बंद