क्रीडाजगतात कोणत्याही खेळामध्ये खेळाडूंच्या जर्सीवर एक नंबर असतो. तो नंबर त्या खेळाडूंची एकप्रकारे ओळख असते. या नंबरमागे अनेक कारणे असतात. क्रिकेटविश्वातील कित्येक खेळाडूंना तर वेगवेगळ्या नंबरची जर्सी घातलेले आपण पाहिले आहे. मात्र भारताचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग तर कधी-कधी नंबर नसेलली जर्सी घालूनच खेळायचा. आता सेहवागने स्वत:च नंबर नसलेली जर्सी घालण्यामागचे कारण सांगितले आहे.
सेहवागने केला खुलासा
आपल्या वीरुची बैठक कार्यक्रमात बोलताना सेहवाग म्हणाला की, “त्याच्या जर्सीवरील नंबरमुळे त्याची आई आणि पत्नी यांच्यात वाद होत असायचा. त्यामुळे सेहवागने दोघींनाही आनंदी ठेवण्यासाठी विना नंबरची जर्सी घालायचे ठरवले होते.”
“मी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर मला ४४ नंबरची जर्सी मिळाली होती. पण माझ्या आईने ज्योतिषांजवळ चौकशी केल्यानंतर त्यांनी हा नंबर माझ्यासाठी योग्य नसल्याचे सांगितले होते, तर दुसऱ्या बाजूला माझ्या पत्नीला त्या नंबरची जर्सी आवडत नव्हती. आईचे म्हणणे होते की, मी ४६ नंबर असलेली जर्सी घालावी, पत्नी २ नंबर असलेली जर्सी घाला म्हणायची. त्यामुळे या सासू-सुनेच्या भांडणात मी नंबर नसलेली जर्सी घालायचा निर्णय घेतला होता. कारण माझे पूर्ण कुटुंब आनंदी असेल, तरच मीही आनंदी राहील,” असे पुढे सेहवाग म्हणाला.
https://www.instagram.com/tv/CG9JDCGACzd/?utm_source=ig_web_button_share_sheet
२०११ सालच्या वनडे विश्वचषकात जर्सीमुळे सेहवाग संकटात सापडला होता. त्याने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विना नंबरची जर्सी घालून फलंदाजी केली होती. त्यामुळे आयसीसीने त्याला चेतावणी दिली होती. त्यावेळी सेहवाग म्हणाला होता की, ‘कसोटीत नंबर नसलेली जर्सी घातली तर चालते, तर मग वनडेत का नाही.’ मात्र पुढे बीसीसीआयने हस्तक्षेप करत सेहवागला या समस्येतून बाहेर काढले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
एकेवेळी करणार होता आत्महत्या; आता करणार भारतीय फलंदाजांच्या दांड्या गुल
धोनी पुन्हा फॉर्ममध्ये आणण्याचा फॉर्मुला सापडला, श्रीलंकन दिग्गजाने सुचवला मोठा उपाय
लॉकडाऊनमध्ये पत्नीसोबत केला टेरेसवर फलंदाजीचा सराव, आता आयपीएलमध्ये धुतोय गोलंदाजांना
ट्रेंडिंग लेख-
CSK vs KKR सामन्यात ऋतुराज गायकवाडसह ‘या’ खेळाडूंनी केले खास ५ विक्रम
अन् भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे क्रिकेटमधून कायमचा संपला
IPL 2020 – धोनीच्या ‘या’ पाच पठ्ठ्यांनी कोलकाताच्या सेनेला दाखवले आस्मान