भारतीय संघात असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत, ज्यांनी क्रिकेट कारकीर्द गाजवली आहे. तसेच, त्यांची गणना जगभरातील विस्फोटक खेळाडूंमध्ये होते. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत त्यांची मुलेही क्रिकेटमध्ये आपले भविष्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर क्रिकेटच्या मैदानात फार पूर्वीच उतरला आहे. तसेच, तो आयपीएलमध्येही सामील झाला आहे. आता त्याच्यापाठोपाठ वीरेंद्र सेहवाग याचा मुलगाही क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवण्यासाठी सज्ज झाला आहे.
दिल्ली संघात सामील झाला आर्यवीर सेहवाग
भारताचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याचा मुलगा आर्यवीर सेहवाग (Aaryavir Sehwag) हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याला विजय मर्चंट ट्रॉफी स्पर्धेत दिल्ली संघात सामील करण्यात आले आहे.
⭐Aaryavir Sehwag – Son of Virender Sehwag is part of Delhi Squad : U16 Vijay Merchant Trophy#CricketTwitter #India #Sehwag #VijayMerchant pic.twitter.com/44WaSVGUlq
— Indian Domestic Cricket Forum – IDCF (@IDCForum) December 6, 2022
मात्र, विजय मर्चंट ट्रॉफी, 16 वर्षांखालील या स्पर्धेत आर्यवीरला पहिल्या सामन्यात दिल्ली संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्यात आले नव्हते. खरं तर, आर्यवीर उजव्या हाताचा फलंदाज आहे. तसेच, तो त्याच्या वडिलांप्रमाणेच विस्फोटक फलंदाजी करण्यात विश्वास ठेवतो. त्याची बॅटिंग स्टाईलही सेहवागसारखीच आहे.
⭐Aaryavir Sehwag – Son of Virender Sehwag is part of Delhi Squad : U16 Vijay Merchant Trophy#CricketTwitter #India #Sehwag #VijayMerchant pic.twitter.com/44WaSVGUlq
— Indian Domestic Cricket Forum – IDCF (@IDCForum) December 6, 2022
आर्यवीरचा आवडता क्रिकेटपटू
प्रत्येक क्रिकेटपटूच्या मुलासाठी त्याचे वडीलच सर्वात आवडते क्रिकेटपटू असतात, असे अनेकदा म्हटले जाते. मात्र, वीरेंद्र सेहवागच्या मुलाचा विषय जरा वेगळा आहे. आर्यवीरला भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा प्रचंड आवडतो. आर्यवीर सोशल मीडियावरही तुफान सक्रिय आहे. तो सरावादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओही शेअर करत असतो. त्याने विराटसोबतचाही एक फोटो शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CLUMIWWD13A/?utm_source=ig_embed&ig_rid=f2cfeaf1-a521-4dc7-95b6-0cbe0ceac76f
वीरेंद्र सेहवागची कारकीर्द
वीरेंद्र सेहवागबद्दल बोलायचं झालं, तर त्याने 104 कसोटी सामने, 251 वनडे सामने आणि 19 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 49.34च्या सरासरीने 8586 धावा चोपल्या आहेत. तसेच, वनडेत 35.05च्या सरासरीने 8273 धावा आणि टी20त 21.88च्या सरासरीने 394 धावा केल्या आहेत. (virender sehwag son aaryavir sehwag is part of delhi squad u16 vijay merchant trophy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘ही तर चीटिंग’, पाकिस्तान- इंग्लंड सामन्यातील टीव्ही पंचांच्या ‘त्या’ निर्णयाने वादाला फुटले तोंड
महत्त्वाच्या संघाची घोषणा! अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी, तर सूर्याही ताफ्यात सामील