भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने जागतिक क्रिकेटमध्ये धमाकेदार फलंदाजी केली आहे. सेहवाग आज आपला ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म २० ऑक्टोबर १९७८ रोजी दिल्ली येथे झाला होता. मोठे फटाके मारत डावाची सुरुवात करणाऱ्या सेहवागने सलामीवीराची जणू व्याख्याच बदलली. वीरेंद्र सेहवाग आणि पाकिस्तानी क्रिकेट संघ यांच्यातील मैदानावरील स्पर्धा आपण बर्याचदा पाहिली असेल.
परंतु सेहवागने क्रिकेटला निरोप दिल्यानंतर आता तो पाकिस्तानी खेळाडूंना लक्ष्य करण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतो. सेहवाग केवळ त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठीच प्रसिद्ध नाही तर तो विनोदीवृत्तीचाही होता. पाकिस्तानी खेळाडूंबद्दल सेहवागच्या मनात एक वेगळेच स्थान आहे. जेव्हा त्याला संधी मिळते तेव्हा तो पाकिस्तानी खेळाडूंना सोशल मीडियावर ट्रोल करताना दिसतो.
या लेखातील पाकिस्तानी खेळाडूंना गमतीने ट्रोल करण्यासाठी सेहवागने सोशल मीडियावर केलेल्या ५ मजेशीर पोस्टचा आढावा घेऊ.
१- हॉकी सामना पराभूत झाल्यावर केले होते ट्रोल
क्रिकेट सामना असो किंवा हॉकी सामना या माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानी खेळाडूंना सोडलं नाही. २०१६ मध्ये मलेशिया येथे सुलतान अझलन शाह चषकादरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात हॉकी सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय हॉकी संघाने आपला एक अद्भुत खेळ दाखवत सामना ५-१ च्या मोठ्या फरकाने जिंकला.
पाकिस्तानविरूद्धच्या मिळालेल्या या मोठ्या विजयानंतर वीरेंद्र सेहवागने, सोशल मीडियावर पाकिस्तानी माजी दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तरची खिल्ली उडविली होती. त्यामध्ये वीरूने ट्विट करताना असे लिहिले होते की,
“क्षमा कर शोएब अख्तर भाई, पण आता हॉकीमध्येही सामना हातातून गेला, भारताने पाकिस्तानचा पराभव केला.”
Sorry @shoaib100mph bhai hockey mai bhi mauka haath se nikal gaya #IndBeatsPak pic.twitter.com/xgrPjkTpSX
— Virender Sehwag (@virendersehwag) April 12, 2016
पण या सेहवागच्या या ट्विटनंतर शोएब अख्तरने कोणताही प्रतिक्रिया दिला नाही.
२- पाकिस्तानला तुफानी खेळीची करुन दिली आठवण
निवृत्तीनंतर माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग सोशल मीडियावर खासकरुन ट्विटरवर खूप सक्रिय आहे. तो अनेकदा पाकिस्तानी खेळाडूंना ट्रोल करण्याचे नवे निमित्त शोधतो. एकदा त्याने पाकिस्तानविरूद्ध एक मजेदार ट्विट केले, जे क्रिकेटच्या कॉरिडॉरमध्ये अजूनही चर्चेत आहे.
खरं तर, २०१७ मध्ये वीरूने पाकिस्तानची चेष्टा करत ट्विट केले की,
“मला ११ वर्षांपूर्वी ही मोठी संधी मिळाली आणि आज तो साजरा केला पाहिजे. पाकिस्तानका भूत बनाया दिवस”
11 years ago, had the privilege to celebrate #PakistanKaBhootBanaya Diwas ! pic.twitter.com/r9pmcbzohi
— Virender Sehwag (@virendersehwag) January 16, 2017
२००६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या लाहोर कसोटी सामन्यात वीरेंद्र सेहवागने २५४ धावा केल्या. लाहोर कसोटीच्या दुसर्या डावात शानदार फलंदाजी करणाऱ्या सेहवागने अवघ्या २४७ चेंडूत २५४ धावा ठोकल्या. त्या खेळीत वीरूने ४७ चौकार आणि एक षटकार मारला होता. हा डाव आठवत सेहवागने भूतपूर्व दिन साजरा केला.
३. सेहवागने १९ वर्षांखालील पाकिस्तान विरुद्ध भारतीय संघाने मिळवलेल्या विजयावरूनही छेडले
या वर्षाच्या सुरुवातीला १९ वर्षांखालील विश्वचषक खेळला गेला. विश्वचषकाचा उपांत्य सामना भारत आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान क्रिकेट संघ यांच्यात रंगला. हा सामना भारतीय संघाने दहा विकेट्सच्या मोठ्या फरकाने सहज जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.
भारतीय युवा संघाचा पाकिस्तानविरूद्ध हा एकतर्फी विजय ठरला. भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानला ट्रोल करण्याची कोणतीही संधी सोडली नाही. खरं तर भारताच्या विजयानंतर वीरूने ट्विट केले की “आता ही सवय झाली आहे …”
Ab toh Aadat si hai !#INDvsPAK pic.twitter.com/HbBjwedqYz
— Virender Sehwag (@virendersehwag) February 4, 2020
विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वरिष्ठ स्तरावरील वनडे विश्वचषकात आतापर्यंत एकूण ७ सामने खेळले गेले असून या सर्वांमध्ये भारतीय संघाने विजयाची चव चाखली आहे. इथेही सेहवागने संपूर्ण पाकिस्तानला तीच गोष्टीची आठवण ट्विट करुन दिली.
४. बेटा-बेटा होता है और बाप बाप…
हा किस्सा आपल्या सर्वाना माहित आहे. २००७ मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाने भारत दौरा केला होता. मालिका सुरू झाल्यानंतर बीसीसीआयने एका पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आणि या कार्यक्रमादरम्यान भारत आणि पाकिस्तानचे संपूर्ण संघ सहभागी झाले होते.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत होते आणि त्या कार्यक्रमादरम्यान शाहरुख खानने वीरूला पाकिस्तानी खेळाडूंशी आधारीत एक मजेदार किस्सा सांगायला सांगितला. यावर, जेव्हा विरूने जो किस्सा सांगितलं तो हाच किस्सा.
खरं तर भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान सेहवाग आणि सचिनची जोडी तुटत नव्हती आणि त्यावेळी अख्तर वारंवार सेहवागला त्रास देण्यासाठी बाऊंसर चेंडू करत होता आणि बोलत होता, ‘माझा चेंडू हुक मारून दाखव’.
सेहवाग शांत राहीला आणि एक धाव घेऊन सचिनला स्ट्राईक दिली आणि तीच गोष्ट सचिन तेंडुलकरला जाऊन सांगितली, मग काय सचिनने अख्तरच्या पुढच्या चेंडूवर मोठा षटकार ठोकत अख्तरचे तोंड बंद केले. त्यानंतर सेहवाग अख्तरकडे गेला आणि म्हणाला, ‘बेटा बेटा होता है और बाप बाप…’’
५. सक्लेन मुश्ताकच्या वाढदिवशी ट्रोल
वीरूने पाकिस्तानविरुद्ध अनेक संस्मरणीय आणि स्फोटक डाव खेळले. त्यातीलच एक म्हणजे त्याचे पाकिस्तान विरुद्धचे त्रिशतक. त्यावेळी सेहवागने सक्लेन मुश्ताकच्या चेंडूवर षटकारासह तिहेरी शतक पूर्ण केले होते. याच षटकाराची आठवण २०१६ मध्ये सेहवागने सक्लेन मुश्ताकला करुन दिली. ते देखील मुश्ताकच्या वाढदिवसाच्या दिवशी. सेहवागने सक्लेन मुश्ताकच्या वाढदिवशी ट्विट करत लिहिले होते की,
“वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय सक्लेन मुश्ताक. आपण नेहमी आनंदी राहा आणि या आठवणीसाठी धन्यवाद. मी हा शॉट पुन्हा पुन्हा पाहतो.”
A very happy birthday dear @Saqlain_Mushtaq .
Stay blessed and Thank you for the memories. Enjoying watching this in loop. pic.twitter.com/QOryy3L2TF— Virender Sehwag (@virendersehwag) December 29, 2016
सेहवागने ज्या व्हिडिओचा उल्लेख केला होता तो मुलतानमध्ये खेळलेला एक कसोटी सामना आहे. या कसोटीत वीरेंद्र सेहवागने शानदार फलंदाजी करताना तिहेरी शतकी खेळी केली आणि भारतासाठी तिहेरी शतक ठोकून इतिहास रचणारा तो पहिला फलंदाज ठरला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
पाकिस्तानविरुद्ध रोहितने आखला तगडा प्लॅन, मोठ्या सामन्यापूर्वी करून टाकला खुलासा