वीरेंद्र सेहवाग, एबी डिव्हिलियर्स, रिषभ पंत, ख्रिस गेल किंवा अॅडम गिलक्रिस्ट ही नावे जगातील सर्वात विस्फोटक फलंदाजांमध्येही समाविष्ट आहेत. पण या सूचित एक नाव नाही आहे जे नाव येथे खरंतर यात असायला हवे होते. सर विवियन रिचर्ड्स असे या खेळाडूचे नाव आहे. हा खेळाडू मैदानात भुकेल्या सिंहासारखा दिसायचा, जो जगातील तगड्या गोलंदाजांनाही आक्रमक फटके मारण्यास कचरायचा नाही.
आज आपण त्याच्याबद्दल बोलू, 1 जून 1985 रोजी त्याने असे तिहेरी शतक ठोकले होते, ज्याने इतिहासामध्ये त्याचे नाव कोरले गेले होते. वास्तविक, वेस्ट इंडिजचा फलंदाज विव रिचर्ड्स त्यावेळी इंग्लंडमध्ये काउंटी चॅम्पियनशिप खेळत होता. सामना टॉन्टनमध्ये वॉर्विकशायर विरुद्ध सोमरसेट यांच्यात झाला. हा सामना होता ज्यामध्ये रिचर्ड्सने त्याच्या फलंदाजीने खळबळ उडविली.
या सामन्यात विंडीजच्या या धुरंदर ने वॉर्विकशायर विरुद्ध सोमरसेटसाठी 322 धावा केल्या. या उत्कृष्ट खेळीत त्याने 42 चौकार आणि 8 षटकार लगावले. रिचर्ड्सने 322 धावांची धावसंख्या गाठण्यासाठी 244 चेंडूंचा सामना केला.100 ते 322 धावांचा पल्ला गाठायला त्यांना फक्त 130 चेंडू लागले.
या सामन्यात रिचर्ड्सने फलंदाजीची अशी दहशत निर्माण केली की त्याने अवघ्या एका दिवसात 322 धावा केल्या. याचा अर्थ असा की संपूर्ण संघाला एका दिवसात साधारज जेवढ्या धावा करता येतात, तेवढ्या फक्त एका फलंदाजाने बनवल्या होत्या. यासह रिचर्ड्स हा देखील एकाच दिवसात तिहेरी शतक झळकावणारा वेस्ट इंडीजचा पहिला फलंदाज ठरला. त्यावेळी इंग्लंडमधील सोमरसेटच्या फलंदाजाकडून प्रथम श्रेणीतील ही सर्वोच्च धावसंख्या होता.
रिचर्ड्सचा विक्रम 21 वर्षे अबाधित होता. यानंतर, सोमरसेटकडून खेळणाऱ्या जस्टिन लॅंगरने सरे विरुद्ध 342 धावा केल्या व त्याने रिचर्ड्सचा विक्रम मागे सोडला. रिचर्ड्सने वेस्ट इंडीजकडून 121 कसोटी सामन्यांमध्ये 50.23 च्या सरासरीने 8540 धावा केल्या आहेत. त्याचवेळी, 187 एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावावर 47 च्या सरासरीने 6721 धावा आहेत. कसोटी सामन्यात त्याने 24 शतके आणि 45 अर्धशतके झळकावली, तर एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावावर 11 शतके आणि 45 अर्धशतके आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
अफलातून! बेयरस्टोने घेतला न्यूझीलंडच्या ओपनरचा अविश्वसनीय झेल, पाहून तुम्हीही कराल पठ्ठ्याचं कौतुक
‘बजरंग बली’ सुरेश रैना! मिस्टर आयपीएलने हाती गदा घेऊन केला वर्कआऊट, Video तुफान व्हायरल