---Advertisement---

व्हीव्हीएस लक्ष्मण असणार भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक, वाचा काय आहे कारण

On: सोमवार, जून 13, 2022 9:56 PM
vvs-laxman
---Advertisement---

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका खेळत आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड  संघासोबत आहे. ही मालिका संपल्यानंतर भारताला आयर्लंड दौऱ्यावर जायचे आहे, पण या दौऱ्यात द्रविड संघासोबत नसतील. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख वीवीएस लक्ष्मण आणि त्यांचे सहकारी आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघासोबत असतील.

माध्यमांतील वृत्तानुसार एनसीएसचे प्रशिक्षक सीतांशु कोटक, साईराज बहुतुले आणि मुनीश बाली या महिन्याच्या शेवटी भारतीय संघासोबत आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये त्यांना जोडले जाणार आहे. एनसीएस प्रमुख वीवीएस लक्ष्मण (VVS Laxman) देखील या दौऱ्यावर मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत संघासोबत असेल. नियमित मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) इंग्लंड दौऱ्यावर जाणार असल्यामुळे या मालिकेत त्यांना सहभागी होता येणार नाही.

द्रविड आणि इतर विरष्ठ अधिकारी या आठवड्याच्या शेवटी इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होतील. भारताच्या वरिष्ठ आणि अनुभवी खेळाडूंच्या संघासोबत हे सर्वजण इंग्लंडसाठी रवाना होणार आहेत. दक्षिण आफ्रिका संघासोबतचे शेवटचे दोन टी-२० सामने भारतीय संघ बाली, कोटक आणि बहुतुले यांच्याच मार्गदर्शानत खेळणार आहे.

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला माहिती दिली आहे की, “वरिष्ठ सपोर्ट स्टाफ इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाल्यानंतर कोटक आणि बहुतुले यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत शेवटच्या दोन सामन्यांमध्ये राष्ट्रीय संघाची जबाबदारी सांभाळावी लागेल.” एनसीएसचे हा सपोर्ट स्टाफ सध्या संघासोबत जोडले गेले आहेत.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ते (एनसीए सपोर्ट स्टाफ) आधीपासूनच मर्यादित षटकांच्या भारतीय संघासोबत आहे. वरिष्ठ सपोर्ट स्टाफ इंग्लंड दौऱ्यावर गेल्यानंतर, ते स्वतःची भूमिका पार पाडतील. आयर्लंड दौऱ्यासाठी संघाची घोषणा अद्याप झालेली नाहीये, पण हा दौरा भारताच्या इंग्लंड दौऱ्यासोबतच होईल, असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

भारतीय संघ मागच्या वर्षी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळला होता. मालिकेतील शेवटचा सामना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केला गेला होता, जो यावर्षी खेळला जाईल. त्याव्यतिरिक्त इंग्लंड दौऱ्यावर भारताला तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी-२० मालिका देखील खेळायची आहे.  कसोटी मालिकेत भारत २-१ ने पुढे आहे, आणि १ जुलैपासून खेळला जाणारा शेवटचा सामना संघासाठी महत्वाचा असेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

‘रोहित आणि विराट आले तरी ‘त्याला’ संघातून बाहेर करू नका’, भारतीय दिग्गजाने थेट प्रशिक्षकांना दिला सल्ला

कार्तिक करू शकतो, तर मी का नाही! ३३ वर्षीय भारतीय वेगवान गोलंदाजाचा हुंकार

अनुष्कासंगे विराटने मालदीवच्या बीचवर घालवल्या सुट्ट्या, शर्टलेस फोटोने इंटरनेटचं वाढवलं तापमान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---