आयपीएलच्या या हंगामात तमिळनाडूचा वेगवान गोलंदाज टी नटराजनने आपल्या शानदार गोलंदाजीने सर्वांचे मन जिंकले. आपल्या यॉर्करच्या अचूक माऱ्याने त्याने ज्या प्रकारे फलंदाजांना त्रास दिला, तसा तो सर्वांच्या नजरेत आला. टी नटराजनच्या शानदार खेळीमुळे ऑस्ट्रेलिया दौर्यावर त्याची भारतीय संघात निवड झाली आहे. भारतीय संघाकडून सराव करीत त्याने प्रथमच ऑस्ट्रेलियामधील नेट्समध्ये गोलंदाजी केली. टी नटराजनचा नेट्समध्ये गोलंदाजी करतानाचा एक व्हिडिओ शेअर करताना बीसीसीआयने नटराजनचे कौतुक केले.
बीसीसीआयने ट्वीट केले की, “त्याने आयपीएलमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आणि आता तो भारतीय संघासोबत नेट्समध्ये गोलंदाजी करीत आहेत. हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे.”
We have seen him bowl with a lot of success in the @IPL and here is @Natarajan_91 bowling in the #TeamIndia nets for the first time after his maiden India call-up! A dream come true moment. 👏 pic.twitter.com/WqrPI0Ab7I
— BCCI (@BCCI) November 15, 2020
बीसीसीआयचा हा व्हिडिओ शेअर करताना दिग्गज माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यानेही नटराजनचे कौतुक केले आहे. लक्ष्मणने ट्वीट करत “एक जबरदस्त प्रेरणादायी कथा,” असल्याचे म्हटले. लक्ष्मणच्या ट्विटला उत्तर देताना टी नटराजनने “सर खूप खूप धन्यवाद,” असे म्हटले आहे.
What a inspirational story👌👏👏🙏 https://t.co/zjGoQuXcUU
— VVS Laxman (@VVSLaxman281) November 15, 2020
Thank you so much sir 💗
— Natarajan (@Natarajan_91) November 15, 2020
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर आहे. या दौऱ्यात तीन वनडे, तीन टी-20 तसेच चार कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना 27 नोव्हेंबरला खेळला जाईल. वरुण चक्रवर्तीला सुरुवातीला भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. परंतु दुखापतीमुळे त्याला संघातून वगळण्यात आले. सनरायझर्स हैदराबादकडून खेळत टी नटराजनने त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे भारतीय संघात स्थान मिळवले.
वरुण चक्रवर्तीच्या जागी निवड समितीने त्याला संघात घेतले आहे. टी नटराजनने 16 आयपीएल सामन्यांत 16 बळी घेतले असून या दरम्यान त्याची सरासरी 31.5 अशी होती. त्याने एका हंगामात सर्वाधिक 65-70 यॉर्कर चेंडू फेकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
सिडनी सिक्सर्सने केला वेस्ट इंडिजच्या ‘या’ खेळाडूशी करार; BBL गाजवण्यास सज्ज
क्रिडा विश्वावर दु:खाचा डोंगर! वयाच्या २१ व्या वर्षीच क्रिकेटपटूने केली आत्महत्या
ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ पठ्ठ्या भारताविरुद्ध कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार
ट्रेंडिंग लेख-
‘जिनीयस’ हेमांग बदानीची पुण्यातील ‘ती’ अद्वितीय खेळी
सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर