भारताचा दिग्गज माजी फलंदाज व्हिव्हिएस लक्ष्मणने आगस्ट 2012 मध्ये अचानक निवृत्तीची घोषणा केली. त्याने ही घोषणा न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी काही दिवस बाकी असताना केली. त्याचा या मालिकेसाठी भारतीय संघात समावेशही झाला होता.
त्यातच न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी काही दिवस बाकी असताना आणि या मालिकेतील पहिला सामना त्याच्या घरच्या मैदानावर हैद्राबाद येथे होणार असतानाही त्याआधीच त्याने ही निवृत्तीची घोषणा केल्याने त्यावेळी अनेक चर्चांना उधाण आले होते.
तसेच या मालिकेतील पहिला सामना त्याच्या घरच्या मैदानावर हैद्राबाद येथे होणार होता. पण त्याने हा सामनाही खेळला नाही.
यानंतर त्याने जेव्हा पत्रकार परिषदेत त्याच्या निवृत्तीचा निर्णय सांगितला तेव्हा, त्याला प्रश्न विचारण्यात आला होता की धोनीला तूझा निर्णय सांगितला का? यावर लक्ष्णनने सांगितले होते की त्याने धोनीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता पण त्याच्याशी संपर्क होत नव्हता.
तसेच काही वृत्ताप्रमाणे त्याने धोनीला निवृत्तीनंतरच्या पार्टीला बोलावले नव्हते. त्यामुळे धोनीवर नाराज असल्याने लक्ष्मणने निवृत्ती घेतल्याची त्यावेळी चर्चा होती. पण आता लक्ष्मणनेच या चर्चेत काहीही तथ्य नसल्याचे सांगितले आहे.
याबद्दल त्याने 281 अँड बियॉन्ड या त्याच्या आत्मचरित्रामध्ये लिहिले आहे, ‘मी फक्त धोनीलाच नाही तर त्यावेळी जेवढ्या खेळांडूबरोबर मी खेळलो त्या सर्वांना मी फोन केले होते. तसेच माझ्या कारकिर्दीत ज्यांचेही योगदान होते त्या सर्व प्रशिक्षक, मित्र अशा सर्वांना फोन केले होते.’
‘पण जेव्हा मी मीडियामध्ये माझ्या निवृत्तीची घोषणा केली तेव्हा मला तूझ्या संघसहकाऱ्यांना याची माहिती दिली आहे का? असा प्रश्न विचारणयात आला. तेव्हा मी हो असे म्हटलो. नंतर मला धोनीशी बोलला का असे विचारले, त्यावर मी गमतीने म्हटलो होतो की सर्वांना माहित आहे धोनीपर्यंत पोहोचणे किती आवघड आहे. पण त्यानंतर माझ्या लक्षात आले की यामुळे वाद आणि गैरसमज निर्माण झाले आहेत. माझ्या कारकिर्दीतील हा पहिला आणि एकमेव वाद होता.’
‘मी चूकून मीडियाला खाद्य पुरवले होते. ज्यामुळे त्यांनी मी धोनीवर नाराज आहे म्हणून निवृत्ती घेतली असा अर्थ घेतला.’
मी हैद्राबाद कसोटी संपण्याची वाट पाहत होतो. ही कसोटी संपल्यानंतर मी माझ्या संघसहकाऱ्यांना आणि सपोर्ट स्टाफला भेटण्यासाठी हॉटेलवर गेलो. मी जेव्हा धोनीला भेटलो तेव्हा त्याने माझ्याकडे पाहिले आणि हसू लागला. तो मला म्हणाला, ‘तूला या सगळ्या वादाची, गैरसमजाची सवय नाही, पण मला आहे. त्यामुळे जास्त मनाला लावून घेऊ नकोस. आपल्याला माहित असते की काहीवेळा सत्य हे चांगली गोष्ट तयार करत नाही.’ त्यावेळी मी त्याच्या साधेपणाने आणि त्याची परिपक्वता पाहून अचंबित झालो होतो.’
लक्ष्मणने निवृत्ती घेतल्यानंतर न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सुब्रमण्यम बद्रीनाथची त्याच्याऐवजी बदली खेळाडू म्हणून निवड झाली होती. लक्ष्मणने 134 कसोटी सामन्यात 45.97 च्या सरासरीने 8781 धावा केल्या आहेत. सध्या तो आयपीएलमधील संघ सनरायझर्स हैद्राबाद संघाचा मार्गदर्शक आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–Video: उस्मान ख्वाजाने घेतला किंग कोहलीचा अप्रतिम झेल
–पहिला कसोटी सामना टीम इंडिया जिंकणारच, जाणुन घ्या कारण
–बाॅर्डर- गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या दिवसाची ऐतिहासिक ट्विटरबाजी