चिंचपोकळी सार्वजनिक उस्तव मंडळ आयोजित “चिंतामणी चषक” राज्यस्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धा सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडांगण, लाल मैदान येथे पार पडलेल्या स्पर्धेचं अंतिम विजेतेपद रत्नागिरी जिल्ह्यातील वाघजाई क्रीडा मंडल दसपटी संघाने पटाकवले.
वाघजाई क्रीडा मंडळ रत्नागिरी विरुद्ध उत्कर्ष क्रीडा मंडळ पुणे यांच्यात अंतिम सामना झाला. दोन्ही संघ बलाढ्य होते. पुणे च्या संघाने आक्रमक खेळ करत मध्यंतरा पर्यत २८-१० अशी भक्कम आघाडी मिळवली. शुभम शिंदेच्या झालेल्या पकडी मुळे रत्नागिरी चा संघ मागे पडला.
मध्यंतरा नंतर वाघजाई रत्नागिरी संघाने आपला खेळ उंचावत सामन्यात परतले. शुभम शिंदे ने आक्रमक चढाईया करत गुण मिळवले. शुभमची एक चढाईत ४ गुणाची सुपररेड निर्णायक ठरली. त्यानंतर वाघजाई संघाने उत्कर्ष संघावर लोन टाकत सामना फिरवला.
शेवटच्या चढाईत ला ३८-३८ असा सामना बरोबरीत होता. शुभम शिंदे ने शेवटच्या चढाईत एक गुणांची कमाई करत वाघजाई संघाने चिंतामणी चषक पटकावला. वाघजाई संघाच्या याविजयाय शुभम शिंदे, ओमकार कुंभार यांनी मोलाची भूमिका बजावली. संघ व्यवस्थापक राजेश कुंभार आणि प्रशिक्षक जगदीश शिंदे याांनी संघाला मार्गगदर्श केले.
अंतिम सामना आधी झालेल्या उपांत्य सामन्यात उत्कर्ष पुणे संघाने ३८-२२ असा जय बजरंग रायगड चा पराभव केला होता. तर वाघजाई संघाने ३२-२४ असा सम्राट सांगलीचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.
चिंतामणी चषक २०१९ निकाल-
विजेतेपद- वाघजाई क्रीडा मंडळ, रत्नागिरी
उपविजेतेपद- उत्कर्ष क्रीडा मंडळ, पुणे
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू- बबलू गिरी (उत्कर्ष
स्पर्धेतील चढाईपटू– शुभम शिंदे (वाघजाई)
स्पर्धेतील पकडपटू– चेतन पारधे