सध्या सर्वत्र कॅरेबियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत रोज काही ना काही असा प्रसंग घडत आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. दरम्यान मंगळवारी (३१ ऑगस्ट) ट्रिनबागो नाइट रायडर्स विरुद्ध सेंट लूसिया या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यादरम्यान वहाब रियाजने कायरोन पोलार्डला उकसवण्याचा प्रयत्न केला होता, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे.
या सामन्यात ट्रिनबागो नाइट रायडर्स संघाने सेंट लूसिया संघावर २७ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात कायरोन पोलार्डने विस्फोटक फलंदाजी करत २९ चेंडूंमध्ये ४१ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ६ चौकार आणि १ गगनचुंबी षटकार लगावला होता. याच खेळीच्या जोरावर त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. या सामन्यादरम्यान एकिकडे पोलार्डचे विस्फोटक रूप पाहायला मिळाले तर दुसरीकडे सेंट लुसिया संघाचा वेगवान गोलंदाज पोलार्डला उकसवताना दिसून आला होता.
तर झाले असे की, पोलार्ड फलंदाजी करत असताना १० वे षटक सुरू होते. त्यावेळी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज रियाज पोलार्डच्या समोर येऊन उभा राहतो आणि त्याला पाहून गालातल्या गालात हसायला सुरुवात करतो. त्यानंतर तो पोलार्डच्या भोवती चक्कर मारताना दिसून येत आहे. परंतु हे सर्व सुरू असताना विस्फोटक पोलार्ड मात्र शांत उभा राहतो. त्याने आपल्या बॅटने जोरदार प्रत्युत्तर दिले.(Wahab Riaz and Kieron Pollard funny moment in st Lucia vs Trinbago knight riders match video went viral)
The fast bowlers are circling 👀 @WahabViki @KieronPollard55 #TKRvSLK #CPL21 #CricketPlayedLouder #BiggestPartyInSport pic.twitter.com/spadc0w2jI
— CPL T20 (@CPL) August 31, 2021
या सामन्यात ट्रिनबागो नाइट रायडर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर ७ बाद १५८ धावा केल्या होत्या. या डावात कर्णधार पोलार्डने सर्वाधिक ४१ धावांचे योगदान दिले. तर टीम सिफर्टने ३७ धावांचे योगदान दिले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सेंट लुसिया संघाकडून सलामीवीर फलंदाज आंद्रे फ्लेचरने नाबाद ८१ धावांची खेळी केली होती. परंतु त्याला इतर कुठल्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही. परिणामी सेंट लुसिया संघाला २० षटकअखेर अवघ्या १३१ धावा करण्यात यश आले. या सामन्यात ट्रिनबागो नाइट रायडर्स संघाने २७ धावांनी विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेशचे गोलंदाज ‘किवीं’वर पडले भारी; पहिल्या टी२०त ७ विकेट्सने उडवला धुव्वा
बांगलादेशपुढे न्यूझीलंडचे फलंदाज निष्प्रभ, ९ जण एकेरी धावसंख्येवर बाद; टी२०तील नकोसा विक्रम नावे
सुरेश रैनाचा ‘जॉन सिना’ अवतार, संघ सहकाऱ्याला अलगद ढकलले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल