---Advertisement---

VIDEO । श्रीलंकन अष्टपैलूचे हे रुप पहिल्यांदाच दिसले, बहिणीच्या लग्नात हसरंगा भावूक

On: शनिवार, ऑगस्ट 26, 2023 6:18 PM
Wanindu Hasaranga gets emotional
---Advertisement---

श्रीलंकन संघाचा अष्टपैलू वानिंदू हसरंगा आगामी आशिया चषक आणि वनडे विश्वचषकात महत्वाचा खेळाडू ठरू शकतो. हसरंगाने नुकतेच लंका प्रीमियर लीग 2023मध्ये जबरदस्त प्रदर्शन केले होते. पण आशिया चषकापूर्वीच त्याच्या दुखापतीच्या बातम्या समोर आल्या. अशातच त्याचा एक व्हिडिओ समोर येत आहे, ज्यामध्ये हसरंगा आपल्या बहिणीच्या लग्नात भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

माध्यमांतील वृत्तांनुसार वानिंदू सहरंगा (Wanindu Hasaranga) याच्या लहान बहिणीचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले. लग्नानंतर हसरंगा आपल्या बहिणीला निरोप देताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अष्टपैलू खेळाडू व्हिडिओत ढसाढसा रडताना दिसत आहे. त्याची बहीण देखील भावूक झाल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. सोबतच लाईक्स देखील मोठ्या प्रमाणात मिळाले आहेत. (Wanindu Hasaranga’s emotional video)

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1695338496654029240?s=20

दरम्यान, वानिंदू सहरंगा याने नुकताच पार पडलेला लंका प्रीमियर लीगचा हंगाम चांगलाच गाजवला. त्याने हंगामात सर्वाधिक धावा केल्याच, पण सर्वाधिक विकेट्स देखील त्याच्याच नावावर होत्या. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला हसरंगा आशिया चषकात आपल्या संघासाठी चांगले प्रदर्शन करू शकत होता. पण माध्यमांतील वृत्तांनुसार हसरंगाला झालेल्या दुखापतीमुळे तो आशिया चषकाचे ग्रुप स्टेजमधील सामने शक्यतो खेळू शकणार नाहीये. काही बातम्यांमध्ये असेही सांगितले जात आहे की, हसरंगा पहिल्या दोन सामन्यांसाठी उपलब्ध नसेल.

हसरंगाच्या दुखापतीसह श्रीलंकन संघ आशिया चषकात चांगलाच अडचणीत आल्याचे दिसत आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार संघातील चार खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. अशात आशिया चषकासाठी संघ निवडणे श्रीलंकन निवड समितीपुढे मोठे अवाहन असणार आहे. आगामी आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र, भारताने पाकिस्तानात जाण्यासाठी स्पष्ट नकार दिल्यामुळे मालिका हायब्रिड मॉडेलवर खेळवली जाणार आहे. अशात 9 सामने श्रीलंकेत, तर चार सामने पाकिस्तानमध्ये आयोजित केले जातील. (Wanindu Hasaranga gets emotional at sister’s wedding)

महत्वाच्या बातम्या – 
वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघात होणार धाकड ‘यंगस्टर’ची एन्ट्री! कर्णधार बटलरने दिले संकेत
‘तिलक वर्माला विश्वचषकात संधी देऊ नका…,’ युवा फलंदाजाविषयी काय हे म्हणाला विश्वचषकविजेता दिग्गज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---