कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंका आणि भारत यांच्यादरम्यान तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना खेळला गेला. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारतीय संघाला ८२ धावांमध्ये रोखल्यानंतर फलंदाजांनी संयमी फलंदाजी करत संघाला २-१ असा मालिका विजय मिळवून दिला. या अंतिम सामन्यात श्रीलंकेसाठी फिरकीपटू वनिंदू हसरंगाने अफलातून गोलंदाजी करत भारतीय संघाचे कंबरडे मोडले. त्याने चार बळी मिळवताना एक नवा विक्रम प्रस्थापित केला.
वाढदिवशी हसरंगाची कमाल
मालिकेतील अखेरच्या सामन्या दिवशीच म्हणजे २९ जुलै रोजी श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगा याने वयाची २४ वर्ष पूर्ण केली. आपला वाढदिवस आणखी खास बनवत त्याने चार षटकात केवळ ९ धावा देऊन चार भारतीय फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. भारतीय डावाच्या पाचव्या षटकात संजू सॅमसन व ऋतुराज गायकवाड यांना बाद करत त्याने भारतीय डावाची घसरगुंडी उडवली. पंधराव्या आणि सतराव्या षटकात अनुक्रमे भुवनेश्वर कुमार व वरूण चक्रवर्ती यांना त्याने तंबूचा रस्ता दाखवला.
या कामगिरीसह हसरंगा वाढदिवशी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी करणारा क्रिकेटपटू बनला (टी२० क्रमवारीतील पहिल्या १० क्रमांकावरील देशांपैकी). यापूर्वीही कामगिरी दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज लेगस्पिनर इम्रान ताहीर याच्या नावे होती. त्याने वाढदिवशी आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात २१ धावात ४ बळी घेण्याची किमया केलेली. वेस्ट इंडीजचा दिग्गज सॅम्युअल बद्री व भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग यांनी आपल्या वाढदिवशी अनुक्रमे १७ धावा देत ३ व २३ धावा धावा देत ३ बळी घेण्याची कामगिरी आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात केलेली.
A 🔥 performance from Sri Lanka in the field restricts India to 81/8.
Birthday boy Wanindu Hasaranga ends up with figures of 4/9 in his four overs 👏#SLvIND | https://t.co/mYciWl62Z7 pic.twitter.com/k0C5uEUAr0
— ICC (@ICC) July 29, 2021
श्रीलंकेचा भविष्यातील प्रमुख खेळाडू मानला जातो हसरंगा
लेगस्पिनर असलेला वनिंदू हसरंगा श्रीलंकेचा भविष्यातील मोठा खेळाडू मानला जातो. उत्कृष्ट गोलंदाजीसह तो खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत मोठे फटके देखील खेळू शकतो. सध्या तो टी२० गोलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी विराजमान आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंकेचा ‘फ्लाईंग’ कर्णधार! तिसऱ्या सामन्यात टिपले दोन अफलातून झेल, पाहा व्हिडिओ
इंग्लंड दौऱ्यात ‘हा’ गोलंदाज भारतासाठी ठरेल हुकमी एक्का, डेल स्टेनचा दावा